Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबईचा फ्लेमिंगो सिटीचा दर्जा धोक्यात

नवी मुंबई परिसरातील निसर्गप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर या संदर्भात कांदळवन कक्ष आणि कांदळवन संरक्षण व संवर्धन समितीकडे तक्रारी दाखल करण्यात आली असून हे प्रकरण एका संस्थेकडून दुसऱ्या संस्थेकडे सोपवत आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 05, 2024 | 11:27 AM
नवी मुंबईचा फ्लेमिंगो सिटीचा दर्जा धोक्यात
Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई-सिद्धेश प्रधान : नेरुळ येथील टीएस चाणक्य परिसरातील कांदळवनांची कत्तल करण्यात आली आहे. हा भाग अद्याप वन विभागाकडे सिडकोने हस्तांतरित केलेला नसल्याने अद्याप त्यावर सिडकोचे हक्क आहेत. तर दुसरीकडे कांदळवनानी बहरलेला भाग असल्याने या ठिकाणी मुबलक प्रमाणात जैवविविधता असून हे जलचर खाण्यासाठी फ्लेमिंगो येथे येत असतात. नवी मुंबईत एन आर आय लगतचा भाग तसेच टी एस चाणक्यच्या मागील बाजू फ्लेमिंगो पक्ष्यांचे आवडते ठिकाण असल्याने येथे या पक्ष्यांचा राबता असतो. हजारो मैलांवरून हे पक्षी या दोन पाणथळ जागांवर उतरतात. मात्र आता हे भाग देखील विकासकांच्या नजरेत भरल्याने ते उध्वस्त करण्याचे प्रयत्न विकासकांनी सुरू केले आहेत. त्यातूनच येथील कांदळवने नष्ट करण्यात आल्याने पर्यावरण प्रेमी संतप्त झाले आहेत. पर्यावरण प्रेमी सुनील अग्रवाल यांनी याचा निषेध म्हणून मानवी साखळी तयार करून निषेध नोंदवला. याचे पडसाद उमटले असून गुरुवारी तहसीलदारांनी या भागाची पाहणी केली आहे.

फ्लेमिंगो अधिवास तलाव वाचविण्यासाठी निसर्गप्रेमीनी पुढाकार घेतला असून यासदर्भात आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे. दर रविवारी सकाळी आठ वाजता निदर्शन करण्यात येणार आहे. त्यानुसार निसर्गप्रेमीनी निषेध व्यक्त केला. यावेळी टीएस चालण्या तलवाचे संरक्षण व खारफुटीचा नाश करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे. यावेळी खारघर येथील सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच मंग्रोव्ह सोलजर्स संस्थेच्या धर्मेश बराई यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध साखळीत सहभागी झाले होते. यावेळी स्वयंसेवकांनी चाणक्य तलाव परिसरात कचरा स्वच्छता मोहीम राबवून एक ट्रक कचरा तलावाबाहेर देखील काढला.

नेरुळ येथील टी एस चाणक्य सागरी प्रशिक्षण संस्थेच्या मागे वसलेले सरोवर ज्याला चाणक्य तलाव संबोधित केले जाते. या चाणक्य तलावाच्या देखभाल व सुरक्षेकडे सिडकोने दुर्लक्ष केले आहे. ही जागा विकासकाला देऊन सिडकोने याआधीच ‘व्यवसायिक दृष्टिकोन ‘ दाखवला आहे. स्थानिक नियोजन प्राधिकरण म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेकडे देखभाल व्यवस्था सुपूर्दही केली नाही. तर या ठिकाणी एका बड्या बिल्डरच्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी आता या भागात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे, स्थानिकांना आणि मच्छिमारांनी चाणक्य तलाव हॉटेल आणि निवासी टॉवर्सच्या बांधकामासाठी विकण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. तर डिसेंबर २०२३ च्या दुसऱ्या आठवड्यात, चाणक्य तलावा बाजूकडील १२० पेक्षा जास्त कांदळवने रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी निर्दयीपणे तोडण्याचा प्रकार घडला आहे.

या मुळे नवी मुंबई परिसरातील निसर्गप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर या संदर्भात कांदळवन कक्ष आणि कांदळवन संरक्षण व संवर्धन समितीकडे तक्रारी दाखल करण्यात आली असून हे प्रकरण एका संस्थेकडून दुसऱ्या संस्थेकडे सोपवत आहेत. नवी मुंबई पर्यावरण संवर्धन संस्था, मांग्रोव्ह सोलजर्स, पर्यावरण दक्षता मंडळ, येऊर एव्हायरंमेंटल सोसायटी, सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालय, राष्ट्र सेवा योजना या संस्था सहभागी झाल्या होत्या.

नवी मुंबई पालिका काय करणार?
तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वच्छ सर्वेक्षणातर्गत नवी मुंबई शहराला गुलाबी रंगात रंगवून फ्लेमिंगो सिटीचा दर्जा देऊन नवी ओळख दिली आहे. त्यानुसार ठिकठिकाणी फ्लेमिंगो स्टॅचू उभारून फ्लेमिंगो पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पाऊल उचलले होते. ज्या दोन पाणथळ जागांच्या आधारावर नवी मुंबई पालिका फ्लेमिंगो शहर म्हणून देशभरात ओळख मिरवत आहे. त्या दोन्ही पाणथळ जागा सिडकोकडून उध्वस्त करण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोप सुनील अग्रवाल व बी एन कुमार या पर्यावरणवाद्यांनी सातत्याने केला आहे. या जागा टिकण्यासाठी टिकवण्यासाठी फ्लेमिंगो पक्षी वाचण्यासाठी पर्यावरण वादी लढत आहेत. मात्र फ्लेमिंगोवर स्वतःचे मार्केटिंग करणारी नवी मुंबई पालिका मात्र सिडकोच्या या कारभारा विरोधात ब्र कढेनासी झाली असल्याने पालिकेच्या या दुटप्पी कारभारा विरोधात पर्यावरणवादी संतप्त झाले आहेत.

Web Title: Navi mumbais flamingo city status is in danger maharashtra government government of india thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2024 | 11:27 AM

Topics:  

  • Government of India
  • Maharashtra Government
  • Navi Mumbai
  • Navi mumbai News Update
  • thane

संबंधित बातम्या

Navi Mumbai Kalyan Connectivity: नवी मुंबई–कल्याण प्रवास लवकरच सुलभ; ऐरोली–कटाई उन्नत मार्ग अंतिम टप्प्यात
1

Navi Mumbai Kalyan Connectivity: नवी मुंबई–कल्याण प्रवास लवकरच सुलभ; ऐरोली–कटाई उन्नत मार्ग अंतिम टप्प्यात

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल
2

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Exclusive: मतदान की खेळ? नवी मुंबईत प्रभागानुसार चार मतदान, मतदार गोंधळात; सामन्यांचं मत नक्की कोणाला
3

Exclusive: मतदान की खेळ? नवी मुंबईत प्रभागानुसार चार मतदान, मतदार गोंधळात; सामन्यांचं मत नक्की कोणाला

Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी
4

Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.