Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नगरसेविका Sahar Sheikh यांच्या वादग्रस्त विधानावर नवनीत राणांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या- “इथे फक्त भगवा आणि निळाच रंग चालणार”

Mumbra Politics: एमआयएमच्या (AIMIM) नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या "मुंब्रा हिरवा करू" या विधानावर भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी कडक शब्दांत प्रहार केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 23, 2026 | 01:57 PM
नगरसेविका Sahar Sheikh यांच्या वादग्रस्त विधानावर नवनीत राणांचे चोख प्रत्युत्तर (Photo Credit- X)

नगरसेविका Sahar Sheikh यांच्या वादग्रस्त विधानावर नवनीत राणांचे चोख प्रत्युत्तर (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • ‘मुंब्रा हिरवा करू’ म्हणणाऱ्या Sahar Sheikh यांना नवनीत राणांचे चोख प्रत्युत्तर
  • म्हणाल्या, “इथे फक्त भगवा आणि निळाच रंग चालणार”
  • काय आहे सहर शेख यांचे वादग्रस्त विधान?
Navneet Rana On Sahar Sheikh: ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंब्र्यातील राजकीय वातावरण आता राज्यस्तरावर तापू लागले आहे. एमआयएमच्या (AIMIM) नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या “मुंब्रा हिरवा करू” या विधानावर भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी कडक शब्दांत प्रहार केला आहे. “या देशात फक्त भगवा आणि निळाच रंग चालेल,” असे म्हणत राणा यांनी सहर शेख यांना थेट इशारा दिला आहे.

नवनीत राणांचे सडेतोड उत्तर

मुंब्र्यातील विजयानंतर सहर शेख यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना नवनीत राणा एका कार्यक्रमात म्हणाल्या, हा देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा देश आहे. ‘मुंब्रा हिरवा करू’ ही तुमची स्वप्ने कधीच पूर्ण होऊ शकणार नाहीत. माझ्यासारखे शिवबांचे भक्त आणि कार्यकर्ते जिवंत असेपर्यंत या देशातून कोणीही भगवा हटवू शकत नाही. आमच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत.

काय आहे सहर शेख यांचे वादग्रस्त विधान?

जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत मुंब्रा प्रभाग ३० मधून विजयी झालेल्या सहर शेख यांनी एका विजयी मिरवणुकीत आक्रमक भूमिका मांडली होती. त्या म्हणाल्या होत्या की, येत्या काळात संपूर्ण मुंब्रा विधानसभा मतदारसंघ आम्ही जिंकू आणि संपूर्ण मुंब्रा ‘हिरवा’ होईल. त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर मोठा गदारोळ निर्माण झाला होता.

“मुंब्र्याला हिरवं करायचं आहे…”; AIMIM नगरसेविका Sahar Sheikh अडचणीत, पोलिसांनी बजावली नोटीस

पोलिसांकडून सहर शेख यांना नोटीस

वातावरण चिघळू नये यासाठी मुंब्रा पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६८ नुसार पोलिसांनी सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांना नोटीस बजावली आहे. समाजात तेढ निर्माण होईल असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे आणि सोशल मीडियावर बोलताना संयम बाळगण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

आव्हाडांना ‘कैसा हराया’ म्हणत डिवचले

जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक राहिलेल्या युनूस शेख यांच्या कन्या सहर शेख यांनी मुंब्र्यात एमआयएमचा झेंडा फडकावला आहे. विजयानंतर त्यांनी आव्हाडांना उद्देशून विचारलेला “कैसा हराया..?” हा प्रश्न सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. एमआयएमने यंदाच्या महापालिका निवडणुकीत १३ शहरांमध्ये १२५ जागा जिंकत मोठी झेप घेतली असून, ठाण्यातही ५ जागांवर विजय मिळवला आहे.

कोण आहेत सहर शेख?

सहर शेख या मुंब्र्यातील प्रभावशाली नेते युनूस शेख यांच्या कन्या आहेत. आव्हाडांची साथ सोडून एमआयएममध्ये प्रवेश करणाऱ्या युनूस शेख यांनी आपल्या मुलीच्या माध्यमातून आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात मोठे खिंडार पाडले आहे. आता या वादात नवनीत राणा यांनी उडी घेतल्याने हा संघर्ष धर्म आणि रंगांच्या राजकारणाकडे वळताना दिसत आहे.

“५ वर्षांत मुंब्र्यात फक्त MIM…”, जितेंद्र आव्हाडांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देणारी Sahar Shaikh कोण आहे?

Web Title: Navneet rana slams sahar shaikh over mumbra green statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • AIMIM
  • Navneet Rana
  • political news

संबंधित बातम्या

‘वाघाला डिवचू नका, वाघ जागा झाला तर भारी पडेल’; शिवेंद्रराजेंच्या डरकाळीने जावळीतील राजकारण तापले
1

‘वाघाला डिवचू नका, वाघ जागा झाला तर भारी पडेल’; शिवेंद्रराजेंच्या डरकाळीने जावळीतील राजकारण तापले

उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांत मार्चमध्ये निवडणुका होणार? राज्यांमध्ये जनगणनेच्या कामाला गती
2

उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांत मार्चमध्ये निवडणुका होणार? राज्यांमध्ये जनगणनेच्या कामाला गती

Sangli : जात प्रमाणपत्र देता की जाता? कोळी समाजाची आक्रमक भूमिका
3

Sangli : जात प्रमाणपत्र देता की जाता? कोळी समाजाची आक्रमक भूमिका

वणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आतापासून हालचाली; भावी उमेदवारांनी बांधले गुडघ्याला बाशिंग
4

वणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आतापासून हालचाली; भावी उमेदवारांनी बांधले गुडघ्याला बाशिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.