पुणे : स्वस्त धान्य दुकानात अद्याप ‘शंभर रुपयांत किराणा किट’ मिळत नसल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसने आंदोलन करीत राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारचा निषेध केला. ही याेजना फसवी असून अन्नधान्य वितरण व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणीही राष्ट्रवादीच्या वतीने केली.
दिवाळीच्या पार्श्वभुमीवर शिंदे – फडणवीस सरकारने शंभर रुपयांत किराणा किट ही याेजना जाहीर केली. अन्न धान्य वितरण साखळीतील स्वस्त धान्य दुकनातून या किटचे वितरण केले जाणार हाेते. मात्र, दिवाळी सुरु हाेऊन तीन दिवस झाले तरी, नागरीक किटसाठी प्रतिक्षाच करीत आहेत. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसने आंदोलन केले.
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, संतोष नांगरे, मृणालिनी वाणी, प्रिया गदादे, विपुल मैसुरकर, बाळासाहेब अटल, विजय बागडे, समीर पवार, शशिकला कुंभार, अमोल ननावरे, मोनहाज शेख, संजय दामोदरे, राहुल गुंड, प्रदीप शिवशरण, शिवम ईभाड, संकेत शिंदे आदी सहभागी झाले हाेते.
[blockquote content=”या शिधा किटवर शिंदे -फडणवीस यांचा फोटो नसल्यामुळे त्याचे वितरण थांबविले गेले आहे का ?. एकीकडे ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, गेल्या दोन वर्षात कोविडमुळे दिवाळी आनंदाने व उत्साहात साजरी करता आली नव्हती. यावर्षी ती आनंदात साजरी करता येणार अशी खोटी आश्वासने देत शिंदे- फडणवीस सरकारने ही लोकप्रिय घोषणा केली. परंतु आजही गरिबांना संबंधित किट मिळू शकलेले नाही.” pic=”” name=”प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.”]