डीसीएम झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पहिला दौरा साताऱ्याला असणार आहे (फोटो सौजन्य - एक्स)
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत पवार कुटुंब अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांचा मुंबईमध्ये शपथविधी असल्याचे माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच पार्थ पवार यांनी शपथविधीपूर्वी शरद पवारांची भेट देखील घेतली होती. यानंतर आता सुनेत्रा पवार या काटेवाडीमध्ये दाखल झाल्या. काटेवाडीमध्ये त्यांनी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांची भेट घेतली. यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या त्यांच्या पहिल्या दौऱ्यावर जाणार आहेत.
हे देखील वाचा : भौमितिक आकारांतून आयुष्य मांडणारे ‘काळाघोडा’चे प्रवेशद्वार! प्लास्टिकचा पुनर्वापर करत पर्यावरणीय संदेश
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पहिला दौरा हा साताऱ्याला असणार आहे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार या आज कराड आणि फलटणच्या दाैऱ्यावर आहेत. सुनेत्रा पवार आज सकाळीच साताऱ्याकडे रवाना झाल्या. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांचा पहिलाच शासकीय दौरा आहे. या दौऱ्यामध्ये 10 वाजता कराड येथे सुनेत्रा पवार या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी दर्शन घेणार आहेत. त्यानंतर फलटण तालुक्यातील तरडगाव येथे जात अजित पवारांचे सुरक्षारक्षक स्वर्गीय विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार आहेत. त्यानंतर त्या बारामतीकडे रवाना होतील. शरद पवार हे कालच मुंबईत आले. रोहित पवार देखील मुंबईत असल्याची माहिती मिळत आहे.
हे देखील वाचा : “शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा अर्थसंकल्प” ; ठाकरे गटाच्या खासदाराची जहरी टीका
अजित पवार यांचे अपघाती निधन
दिवंगत नेते अजित पवार यांचे 28 फेब्रुवारी रोजी बुधवारी विमान अपघात झाला. . लँडिंगदरम्यान विमान (Learjet 45) धावपट्टीजवळ कोसळले. यामुळे विमानामध्ये तीन स्फोट झाले. विमानाला लागलेल्या आगीमध्ये सर्व प्रवासी आणि विमान जळून खाक झाले. या विमानाचा अपघात इतका भीषण होता की यामध्ये उपमुख्यमंत्र्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित कपूर आणि सेकंड-इन-कमांड कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता. गुरुवारी बारामतीतील काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.






