Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai News: वाईत गद्दारीचा निषेध! विराज शिंदेंच्या विरोधात राष्ट्रवादीचा विराट मोर्चा, पुतळ्याचे जोडे मारून दहन

राष्ट्रवादीशी प्रतारणा केल्यामुळे वाईत विराज शिंदे आणि ऋतुजा शिंदे यांच्या विरोधात भव्य निषेध मोर्चा. कार्यकर्त्यांनी पुतळा जाळून व्यक्त केला संताप.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 06, 2026 | 06:51 PM
वाईत गद्दारीचा निषेध! विराज शिंदेंच्या विरोधात राष्ट्रवादीचा विराट मोर्चा

वाईत गद्दारीचा निषेध! विराज शिंदेंच्या विरोधात राष्ट्रवादीचा विराट मोर्चा

Follow Us
Follow Us:

 

  • वाईत गद्दारीचा निषेध!
  • विराज शिंदेंच्या विरोधात राष्ट्रवादीचा विराट मोर्चा
  • पुतळ्याचे जोडे मारून दहन
वाई / प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसशी प्रतारणा करून भाजपशी हातमिळवणी केल्याचा ठपका ठेवत, सोमवारी (आज) वाई शहरात विराज शिंदे आणि जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि बावधन गटातील मतदारांनी भव्य निषेध मोर्चा काढला. “मतदारांशी बेईमानी करणाऱ्यांचा धिक्कार असो” अशा उपरोधिक आणि संतप्त घोषणांनी यावेळी संपूर्ण वाई शहर दणाणून गेले होते.

नियोजित आराखड्याप्रमाणे सोमवारी सकाळी अकरा वाजता महागणपती घाटावरून या मोर्चाला प्रारंभ झाला. हा मोर्चा महात्मा फुले मंडईमार्गे धर्मपुरी पेठेतील विराज शिंदे यांच्या ‘विराज गॅस एजन्सी’वरून ब्राम्हणशाही मार्गे मुख्य किसन वीर चौकात पोहोचला. विशेष म्हणजे, विराज शिंदे यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी थांबून अत्यंत आक्रमकपणे घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. मोर्चाचा समारोप किसन वीर चौकात झाला.

Wai News: वाईत ‘राष्ट्रवादी’ आक्रमक! ऋतुजा शिंदेंच्या घरावार उद्या धडकणार निषेध मोर्चा; बावधनमधील कार्यकर्त्यांचा संताप

यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, माजी जि . प.सदस्य महादेव मस्कर आणि खरेदी विक्री संघाचे चेअरमन मदन आप्पा भोसले यांनी आपली निषेधपर मनोगते व्यक्त केली. “ज्या मतदारांनी विश्वासाने निवडून दिले, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम विराज शिंदे पती-पत्नींनी केले आहे,” अशी टीका यावेळी करण्यात आली. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी विराज शिंदे यांचा प्रातिनिधिक पुतळा तयार करून त्याला जोडे मारले आणि जाहीर दहन केले.

या आंदोलनात वाई तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि बावधन गटातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने जि.प. सदस्या वृषाली चव्हाण, बापूसाहेब शिंदे, वर्षा जगताप, माजी सभापती दिलीप पिसाळ, सत्यजित वीर, शहर अध्यक्षा निशा डाळवाले, माजी जि. प. सदस्य शशिकांत पवार, बाजार समिती चेअरमन मोहन जाधव, बाजार समितीचे विनायक येवले, नगरसेवक सनी चव्हाण, संतोष ननावरे, निलेश शिंदे, विलास मांढरे यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. बावधन जिल्हा परिषद गटातील या राजकीय बंडाळीमुळे वाई तालुक्यातील राजकारण आता चांगलेच तापले असून, या गद्दारीचा हिशोब आगामी काळात मतदारच करतील, असा सूर या मोर्चातून उमटला आहे.

वाई तालुक्यातील भोगावमध्ये अवकाळीचा तडाखा; घरावरील पत्रे उडाले अन्…; प्रांताधिकाऱ्यांनी केली पाहणी

Web Title: Ncp stages massive protest against viraj shinde burns his effigy after beating it with footwear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • NCP News
  • Satara News
  • Wai News

संबंधित बातम्या

साताऱ्यात ‘स्मार्ट मीटर’वरून ठिणगी! महावितरण कार्यालयावर उद्या शरद पवार गटाचा हल्लाबोल; ‘या’ नेत्याकडे आंदोलनाचे नेतृत्व
1

साताऱ्यात ‘स्मार्ट मीटर’वरून ठिणगी! महावितरण कार्यालयावर उद्या शरद पवार गटाचा हल्लाबोल; ‘या’ नेत्याकडे आंदोलनाचे नेतृत्व

Satara News: साताऱ्यात रिपब्लिकन सेनेचे आक्रमक आंदोलन; आत्मदहन व गळफासाच्या इशाऱ्याने खळबळ
2

Satara News: साताऱ्यात रिपब्लिकन सेनेचे आक्रमक आंदोलन; आत्मदहन व गळफासाच्या इशाऱ्याने खळबळ

मुसळधार पावसाचा कहर, निसरेफाटा, एफिल, रासे परिसर जलमय; घरांमध्ये व दुकानगाळ्यांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान
3

मुसळधार पावसाचा कहर, निसरेफाटा, एफिल, रासे परिसर जलमय; घरांमध्ये व दुकानगाळ्यांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान

काळीज पिळवटून टाकणारी घटना! एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील ४ जणांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू
4

काळीज पिळवटून टाकणारी घटना! एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील ४ जणांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.