Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Neral Matheran Mini Train: माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर; नेरळ-माथेरान मिनीट्रेन पुन्हा धावणार

Neral Matheran Mini Train: माथेरानला दिवाळीच्या सुट्टीत भेट देण्याचे नियोजन करणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक ३० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. निसर्गरम्य डोंगररांगा आणि घाटातून धावणारी ही मिनीट्रेन पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 29, 2026 | 07:00 PM
माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर; नेरळ-माथेरान मिनीट्रेन पुन्हा धावणार

माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर; नेरळ-माथेरान मिनीट्रेन पुन्हा धावणार

Follow Us
Follow Us:
  • दिवाळी पर्यटनासाठी आनंदाची बातमी!
  • ३० ऑक्टोबरपासून नेरळ-माथेरान मिनीट्रेनची प्रवासी सेवा सुरू
  • दिवाळीत माथेरानची सफर मिनीट्रेनने करता येणार
माथेरान: जगभरातील पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन शुक्रवार ३० ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा नॅरोगेज रुळावर येणार आहे. मिनी ट्रेनची प्रवासी गाडी १५ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी सुट्टीवर जात असते.मात्र यावर्षी तब्बल १५ दिवस उशिरा नेरळ माथेरान नेरळ मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे.दरम्यान यावर्षी दिवाळी सुरू होण्याआधी मिनी ट्रेनची प्रवासी वाहतूक सुरू होत असल्याने माथेरान मधील व्यवसाय आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Neral Matheran Mini Train)

जगभरातील पर्यटकांची लाडकी नेरळ माथेरान नेरळ मार्गावर चालणारी मिनीट्रेन यावर्षी 15 ऑक्टोबर रोजी सुरू झालेली नाही.त्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली असून या महिन्याचे अखेरीस मिनी ट्रेनची नेरळ माथेरान नेरळ अशी प्रवासी सेवा सुरू होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकचा गाळ पुन्हा चर्चेत; 1000 ट्रक गाळाच्या नोंदीवरून प्रश्नचिन्ह

१९०७ मध्ये ब्रिटिश काळात नेरळ जंक्शन स्थानकातून माथेरान साठी मिनी ट्रेन सुरू झाली.२१ किलोमीटर अंतरावर नॅरोगेज मार्गावर चालणारी मिनी ट्रेन नेहमीप्रमाणे १५ जून पासून पावसाळी सुट्टीवर गेलो होती,मात्र नेहमीप्रमाणे १५ ऑक्टोबर रोजी सुरू होणारी प्रवासी वाहतूक यावर्षी अद्याप सुरू झालेली नाही. यावर्षी १५ सप्टेंबर पासून पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे मिनीट्रेनचा मार्ग सुस्थितीत आहे.

परंतु मध्य रेल्वे कडून काही बदल या मार्गावरील वाहतुकीत करण्याच्या हालचाली सुरू आहेत.त्यामुळे नेरळ माथेरान नेरळ मार्गावर प्रवासी सेवा सुरू होण्यात चालढकल सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. युनोस्को वर्ल्ड हेरिटेज ट्रेन मध्ये समाविष्ट असल्याने मिनी ट्रेन आणखी आकर्षक बनवण्यात भर देण्यात येत आहे.या गाडीवर नेरळ माथेरान नेरळ मार्गावर प्रवासी वाहतूक करीत असते त्यावेळी अधिकारी कर्मचारी वर्गावर होणारा खर्च प्रवासी वाहतूक मधून भरून निघत नाही.परंतु केवळ हेरिटेज नामावलीमध्ये समाविष्ट असल्याने नेरळ माथेरान मार्गावर चालवली जाणारी मिनीट्रेन मध्य रेल्वे कडून चालवली जाणार आहे.यावर्षी १५ ऑक्टोबर रोजी नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेनची प्रवासी वाहतूक सुरू झाली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

नेरळ माथेरान नेरळ या मार्गावरील पर्यटकांची आवडती टॉय ट्रेन सेवा येत्या शुक्रवार ३० नोव्हेंबर पासून पूर्ववत होत असल्याची माहिती मध्य रेल्वे कडून जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार नेरळ माथेरान नेरळ मार्गावर नेरळ येथून दररोज सकाळी माथेरान साठी दोन तर माथेरान वरून नेरळ साठी दुपारी दोन प्रवासी गाड्या सोडण्यात येणार आहे.नेरळ येथून सकाळी आठ वाजून ५० मिनिटांनी तसेच दुसरी प्रवासी गाडी १० वाजून २५ मिनिटांनी माथेरान साठी रवाना होणार आहे.या दोन्ही गाड्यांचे तिकीट स्थानकात गाडी सुटण्याचे एक तास आधी सुरू होत असते.

इंजिनाची दुरुस्ती रखडली..

नेरळ येथील लोको कार्यशाळा मध्ये एकूण आठ डिझेल इंजिन असून त्यातील तीन इंजिन नादुरुस्त अवस्थेत होती.तर पाच इंजिनाची दुरुस्ती उशिरा झाल्याने यावर्षी १५ ऑक्टोबर रोजी मिनी ट्रेनची नेरळ माथेरान नेरळ प्रवासी वाहतूक सुरू झाली नव्हती.

नवीन गाड्यांची घोषणा नाही..

मात्र मिनीट्रेनच्या प्रवासी फेऱ्यांमध्ये कोणतीही वाढ होण्याची मावळली आहे.गेल्या दोन वर्षापासून नेरळ माथेरान नेरळ मार्गावर केवळ दोनच प्रवासी गाड्या चालवल्या जातात.त्यात वाढ करण्याची अनेक वर्षाची मागणी मध्य रेल्वे ने मान्य केली नाही.

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेरळ-माथेरान मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक कधी सुरू होणार आहे?

    Ans: नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक ३० ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Que: मिनीट्रेन सुरू झाल्यामुळे पर्यटकांना काय फायदा होईल?

    Ans: दिवाळीच्या सुट्टीत माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांना निसर्गरम्य घाटातून मिनीट्रेनने प्रवास करण्याचा आनंद घेता येईल.

  • Que: नेरळ-माथेरान मिनीट्रेन कोणत्या मार्गावर धावणार आहे?

    Ans: मिनीट्रेन नेरळ-माथेरान-नेरळ या मार्गावर प्रवासी वाहतूक करणार आहे. प्रवासाचे वेळापत्रक, तिकीट दर आणि उपलब्ध फेऱ्यांसाठी रेल्वेची अधिकृत माहिती तपासावी.

Web Title: Neral matheran neral minitrain passenger service resumes october 30 diwali tourism sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • maharashtra
  • matheran news
  • Mini Train

संबंधित बातम्या

Matheran News: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! माथेरानमध्ये प्रवासी घोड्यांची वाहतूक ठप्प होणार?
1

Matheran News: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! माथेरानमध्ये प्रवासी घोड्यांची वाहतूक ठप्प होणार?

Devendra Fadnavis: ॲपआधारित टॅक्सी सेवांमध्ये समान संधीवर भर; समुच्चय वाहन धोरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना
2

Devendra Fadnavis: ॲपआधारित टॅक्सी सेवांमध्ये समान संधीवर भर; समुच्चय वाहन धोरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना

NCMC Card Registration: महिलांनो, NCMC कार्ड नोंदणी करा अन्यथा…; एसटी महामंडळाचे निर्देश
3

NCMC Card Registration: महिलांनो, NCMC कार्ड नोंदणी करा अन्यथा…; एसटी महामंडळाचे निर्देश

Ravikant Tupkar: ५ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक? रविकांत तुपकर आक्रमक; पुढील महिन्यात मोठ्या आंदोलनाचा इशारा
4

Ravikant Tupkar: ५ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक? रविकांत तुपकर आक्रमक; पुढील महिन्यात मोठ्या आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.