Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : ‘हिंदूंच्या सणाला विरोध का?’ नवरात्रोत्सवाच्या मैदानावरून मीरा-भाईंदरमध्ये वाद; सरनाईकांचा महापालिकेला थेट सवाल

Pratap Sarnaik : मीरा-भाईंदरमध्ये नवरात्रोत्सवासाठी मैदानाच्या वापरावरून वाद निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत भाडे भरून मैदान घेत असताना उत्सवाला विरोध का, असा प्रश्न केला. याचवेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

  • By विवेक
Updated On: Oct 08, 2026 | 07:50 PM
Pratap sarnaik on Garba

Pratap sarnaik on Garba

Follow Us
Follow Us:
  • ‘भाडे भरून मैदान घेतो, मग हिंदूंच्या सणाला विरोध का? – प्रताप सरनाईक
  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ८ ते १० कोटींच्या मदतीचा मानस
  • मुख्यमंत्री सहायता निधीत मदतीचे आवाहन
 

मीरा-भाईंदर : दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवासाठी पद्मभूषण मेजर ध्यानचंद मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, महासभेचा ठराव झाल्याचे कारण देत महापालिकेने मैदान भाड्याने देण्यास नकार दिल्याचा आरोप महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी केला. यावरून मीरा-भाईंदर महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना, “भाडे भरून महापालिकेची मैदाने घेतो, मग हिंदूंच्या सणाला विरोध का?” असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

महासभेच्या ठरावाच्या एक दिवस आधीच मैदानाचे बुकिंग करण्यात आले होते, असा दावा सरनाईक यांनी केला. वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी महापालिका आयुक्तांकडे काही मैदानांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी एक मैदान उपलब्ध करून देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

“आम्ही महापालिकेची मैदाने भाडे भरून घेतो आणि महापालिकेला निधीही देतो. मग नागरिकांच्या भावनांशी का खेळले जात आहे? स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे सत्ताधारी हिंदूंच्या सण-उत्सवांनाच अडथळे निर्माण करत असतील, तर याचा विचार झाला पाहिजे,” अशी भूमिका सरनाईक यांनी मांडली.

Mumbai Navratri 2026: मुंबईत सर्वात मोठा गरबा महोत्सव; रंगणार ‘रंगीलो रे’चा जल्लोष, नवरात्रीचा उत्साह होणार डबल

विरोधी पक्षातील सदस्य, कार्यकर्ते आणि नेत्यांना कार्यक्रमांसाठी मैदान अथवा महापालिकेच्या सुविधा मिळवताना परवानगीसाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ताधारी-विरोधक असा भेद न करता सर्वांना समान नियम आणि समान वागणूक मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

मैदान धोरणावरून पुन्हा वाद

महापालिकेच्या मैदान वापराच्या धोरणावरून यापूर्वीही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मैदानांच्या वापराबाबत निर्बंध आणण्याच्या भूमिकेवरून नवरात्रोत्सव, दहीहंडी यांसह विविध सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनाचा मुद्दा चर्चेत आला होता. दुसरीकडे, मैदानांचा वापर क्रीडा उपक्रमांसाठी व्हावा आणि मोठ्या कार्यक्रमांमुळे मैदानांचे नुकसान होऊ नये, अशी प्रशासनाची भूमिका असल्याचे सांगण्यात आले आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ८ ते १० कोटींच्या मदतीचा मानस

यंदाचा नवरात्रोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपयोगात आणण्याचा संकल्प असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. शेतकरी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, वैद्यकीय मदत आणि अन्य आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक पातळीवर ८ ते १० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा परिसरातील १०१ शेतकरी कुटुंबांना गायींचे वाटप करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. शेतकरी कुटुंबांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने सुमारे सव्वा कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सहायता निधीत मदतीचे आवाहन

नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीची माहिती देणारा स्टॉल उभारण्यात येणार असून, नागरिकांना आर्थिक मदत करायची असल्यास ती थेट मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच अन्नधान्य, मेडिकल किट, सायकल किंवा अन्य उपयुक्त साहित्याच्या स्वरूपात मदत करू इच्छिणाऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे आवश्यक परवानगी मागण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मदत स्वीकारताना पारदर्शकता राखली जाईल आणि कोणत्याही प्रकारचा गैरसमज निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

मोफत गरबा, प्रवेशासाठी क्यूआर कोड

यंदाचा नवरात्रोत्सव आणि गरबा कार्यक्रम पूर्णपणे मोफत ठेवण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. नागरिकांकडून कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. प्रवेशासाठी क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात आली असून, त्याद्वारे नागरिकांना उत्सवात सहभागी होता येणार आहे.

“नवरात्रोत्सव हा सर्वसामान्य जनतेचा उत्सव आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा आणि त्याचबरोबर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठीही योगदान द्यावे,” असे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, मैदानाच्या परवानगीचा प्रश्न आता राजकीय वादाचा केंद्रबिंदू बनला असून, या प्रकरणी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे महापालिका प्रशासन मैदानाबाबत पुढील निर्णय काय घेते, याकडे आता मीरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Navratri Traffic: कल्याणमध्ये नवरात्रोत्सवासाठी वाहतुकीत मोठे बदल; ‘या’ ७ मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी

Web Title: Mira bhayandar navratri ground row pratap sarnaik dhyan chand ground

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 07:50 PM

Topics:  

  • Mira Bhayandar Municipal Corporation
  • Mira Bhayandar News
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना प्रताप सरनाईकांना अश्रू अनावर; ‘अंकुश’ चित्रपटाचा सांगितला खास किस्सा
1

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना प्रताप सरनाईकांना अश्रू अनावर; ‘अंकुश’ चित्रपटाचा सांगितला खास किस्सा

Mira-Bhayandar Ajuba Bridge News: अजुबा ब्रीजवर घाणीचे साम्राज्य; मनसेचा पालिका-MMRDA प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम
2

Mira-Bhayandar Ajuba Bridge News: अजुबा ब्रीजवर घाणीचे साम्राज्य; मनसेचा पालिका-MMRDA प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी
3

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी

Helping Hand Stricken Farmers : वाढदिवसाचा खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात; हसमुख गेहलोत यांचा अनोखा उपक्रम
4

Helping Hand Stricken Farmers : वाढदिवसाचा खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात; हसमुख गेहलोत यांचा अनोखा उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.