Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता ट्राफिक जॅमची समस्या विसरा, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार

महावाणिज्यदूत ओस्टबर्ग यांनी पोर्टच्या विकासात स्वीडन कंपनी योगदान देवू इच्छित असल्याने सांगितल्याने मंत्री नितेश राणे यांनी ससून डॉकची पाहणी करण्याची सूचना केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 21, 2025 | 03:27 PM
आता ट्राफिक जॅमची समस्या विसरा, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार
Follow Us
Follow Us:

सिंधुदुर्ग /भगवान लोके : देशाची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच मुंबई पर्यटनासाठी देखील तितकीच महत्त्वाची आहे. मुंबईच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि मुंबईकरांच्या सेवेसाठी ई-वॉटर टॅक्सी लवकरच सुरु होणर आहे. मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार असून देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे.

या नव्या सुविधेसाठी पाश्चात कंपनीची मदत घेण्यात आली आहे. स्विडनच्या कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबविणार आहे. ही सेवा त्वरीत सुरू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्विडनचे महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांना बैठकी दरम्यान केल्या आहेत. मंत्रालयात आज मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याशी महावाणिज्य दूत ओस्टबर्ग यांनी ई-वॉटर टॅक्सीबाबत चर्चा केली. यावेळी ओस्टबर्ग यांच्या सल्लागार सलोनी झव्हेरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Samruddhi Highway Toll hike : समृद्धी महामार्गाचा प्रवास महागणार! प्रवाशांच्या खिशाला कात्री देत मोठी टोलवाढ

मुंबई महानगरामध्ये प्रचंड वाहतूक यंत्रणेवर ताण येत असून ई-वॉटर टॅक्सी लवकर सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग या जलवाहतूक मार्गाच्या पायलट प्रोजेक्टने मुंबईला भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. स्विडनच्या कँडेला कंपनीशी झालेल्या करारानुसार त्यांनी नागरिकांची सुरक्षितता, वातावरण, पर्यावरण यांचा विचार करावा. शिवाय वॉटर टॅक्सीचे नागरिकांना परवडणारे माफक दर ठेवावेत. कंपनीला लागणाऱ्या परवान्याबाबत राज्य शासन दक्षता घेईल, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

यावेळी ओस्टबर्ग म्हणाले , महाराष्ट्रातील पोर्टच्या विकासात स्वारस्य आहे. स्वीडनची कॅंडेला कंपनी येवून सर्व माहितीचे सादरीकरण करेल. त्यानंतर वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट त्वरीत सुरू केला जाईल. पोर्टचा विकास, स्वच्छता, सोयी-सुविधा,गुंतवणुकी बाबतची माहिती दिली.

पुण्यात आता पाणी बचत होणार अन् गळती थांबणार; महापालिकेने उचलले ‘हे’ महत्त्वपूर्ण पाऊल

पोर्टच्या ससून डॉकला मॉडेल पोर्ट करा –

महावाणिज्यदूत ओस्टबर्ग यांनी पोर्टच्या विकासात स्वीडन कंपनी योगदान देवू इच्छित असल्याने सांगितल्याने मंत्री नितेश राणे यांनी ससून डॉकची पाहणी करण्याची सूचना केली आहे. स्विडन कंपनीने राज्य शासनाला पोर्टच्या विकासाबाबत प्रस्ताव सादर करावा असं ही सांगण्यात आलं आहे. वाहतुकीसाठी सुलभ ठिकाणांची पाहणी करून देशात एक नंबर होईल, असे मॉडेल पोर्ट विकसित करावे. यासाठी मेरीटाईम बोर्डाशी चर्चा करून एप्रिलमध्ये पाहणी करून अहवाल सादर करावा, असेही मंत्री राणे यांनी सांगितले आहे.

Web Title: Nitesh rane now forget the problem of traffic jams the countrys first e water taxi will run in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 03:27 PM

Topics:  

  • marathi latest news
  • Mumbai
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

Nitesh Rane : आदित्य ठाकरे विदेशात गेले? दिशा सालियान प्रकरण पुन्हा चर्चेत; नितेश राणेंच्या गंभीर दाव्याने राजकारणात खळबळ
1

Nitesh Rane : आदित्य ठाकरे विदेशात गेले? दिशा सालियान प्रकरण पुन्हा चर्चेत; नितेश राणेंच्या गंभीर दाव्याने राजकारणात खळबळ

Middle East Breaking :जगाची धडधड वाढली,तेलाच्या बाजारात खळबळ ;रियादच्या Aramco वर हुथींचा हल्ला
2

Middle East Breaking :जगाची धडधड वाढली,तेलाच्या बाजारात खळबळ ;रियादच्या Aramco वर हुथींचा हल्ला

Sindhudurg News :सिंधुदुर्गात पाणीटंचाईची शक्यता; वाड्या-वस्त्यांपासून धरण लाभक्षेत्राबाहेरील गावांसाठी नितेश राणेंचे मोठे निर्देश
3

Sindhudurg News :सिंधुदुर्गात पाणीटंचाईची शक्यता; वाड्या-वस्त्यांपासून धरण लाभक्षेत्राबाहेरील गावांसाठी नितेश राणेंचे मोठे निर्देश

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!
4

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.