समृद्धी महामार्गावरील टोलमध्ये तीन वर्षांसाठी १९ टक्के वाढ करण्यात आली (फोटो - सोशल मीडिया)
नागपूर : राज्यातील सर्वात चर्चेत असलेला महामार्ग हा समुद्धी महामार्ग आहे. नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आहे. हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांशी प्रकल्प आहे. याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यापूर्वीच समुद्धी महामार्गाचा प्रवास महागला आहे. टोलवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गतील पूर्ण रस्ता अद्याप झालेला नाही. 701 किलोमीटरच्या या पूर्ण मार्गावरील फक्त 625 किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे. आता येत्या महिन्याभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित 76 किलोमीटरचा मार्ग सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वीच टोलवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीने टोलवाढीचा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावर 19 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
समृद्धी महामार्गावरील प्रवास महाग होणार आहे. एमएसआरडीसीने 19 टक्के दरवाढीचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 एप्रिलपासून हे नवीन दर लागू होणार आहेत. समृद्धी महामार्गात आता केलेली 19 टक्के दरवाढ ही तीन वर्ष स्थिर राहणार आहे. त्यानंतर पुन्हा आढावा घेऊन दरवाढ केली आहे. आता पुढील तीन वर्षासाठी म्हणजेच 31 मार्च 2028 पर्यंत हे दर लागू राहतील, अशी माहिती एमएसआरडीसीने दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
समृद्धी महामार्गाचे हे सुधारित दर हे एक एप्रिल 2025 ते 31 मार्च 2028 पर्यंत असणार आहेत. नागपूर ते इगतपुरीपर्यंत कार, हलकी मोटर यांना सध्या 1080 रुपयांचा टोल लागायचा मात्र नव्या दरानुसार 1,290 रुपये लागतील हलकी व्यावसायिक, मिनीबस सध्या 1745 टोल होतो. तो नवीन वरवाढीनुसार 2075 रुपये करण्यात आला. बस किंवा दोन आसनाच्या ट्रकासाठी आतापर्यंत 3655 रुपये लागत होते. आता नवीन दर 4355 रुपये असणार आहे. अति अवजड वाहनांना जुने दर 6980 होते. नवे दर 8315 रुपये असणार आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग टप्प्याटप्प्या पूर्ण करुन प्रवाशांना खुला करण्यात आला. यामध्ये 11 डिसेंबर 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते शिर्डी दरम्यान 520 किमी एक्सप्रेस वेचे उद्घाटन केले होते. नंतर, 23 मे 2023 ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी ते भरवीर असा 105 किमीचा मार्ग खुला केला. त्यानंतर 4 मार्च 2024 रोजी आणखी 25 किमी (भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा) मार्ग वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला. आता शेवटचा 76 किमीचा रस्ता बाकी आहे. हा भिवंडी-इगतपुरी रस्ता आहे. याचे काम सुरु असून तो अद्याप सुरु होणे बाकी आहे.