Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nitesh Rane: दीड-दोन तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत! सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा

Nitesh Rane: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलवाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक फेरीबोट सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाचा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आढावा घेतला. सुरुवातीला कर्ली-तारकर्ली मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर फेरीसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 07, 2026 | 06:50 PM
दीड-दोन तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत! सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा

दीड-दोन तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत! सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा

Follow Us
Follow Us:
  • सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा
  • नितेश राणेंकडून जलवाहतूक प्रकल्पाचा आढावा
  • कर्ली-तारकर्ली मार्गावर फेरीसेवेचा प्रस्ताव
Nitesh Rane: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलवाहतूक अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे. या जिल्ह्यात आधुनिक फेरीबोट सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाचा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आढावा घेतला. या प्रकल्पामुळे जलवाहतूक बळकट होण्यासोबत पर्यटन, स्थानिक जहाजबांधणी, सागरी अभियांत्रिकी आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलवाहतुकीसंदर्भात मंत्रालयातील समिती कक्षात नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी नवीन फेरीबोटची बांधणी, कार्यान्वयन आणि देखभाल यासंदर्भातील प्रस्तावाचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

Smart Meter Protest: ‘स्मार्ट मीटर हटवा, अन्यथा उखडून फेकू’; शेकापचे जयंत पाटील यांचा सरकारला इशारा

पाच संभाव्य जलमार्गांचा प्रस्ताव

सिंधुदुर्ग जिल्ह्यात फेरीबोट सेवेसाठी सध्या पाच संभाव्य मार्गांचा विचार करण्यात येत आहे. त्यामध्ये कर्ली जेट्टी-तारकर्ली जेट्टी, काळी जेट्टी-देवबाग जेट्टी, देवबाग जेट्टी-निवती जेट्टी, विजयदुर्ग अनुसरे-दांडे आणि आरोंदा-किरणपाणी या मार्गांचा समावेश आहे. मात्र, या मार्गांवर प्रत्यक्ष सेवा सुरू करण्यापूर्वी सविस्तर सर्वेक्षण करण्याचे निर्देश राणे यांनी दिले आहेत. जेट्टीची उपलब्धता, समुद्रातील भरती-ओहोटी, पाण्याची आवश्यक खोली तसेच संबंधित मार्गांवरील प्रवासी आणि वाहनांची संभाव्य मागणी यांचा अभ्यास करून अंतिम मार्ग निश्चित केला जाणार आहे.

कर्ली-तारकर्ली मार्गावर पहिला प्रयोग

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात कर्ली ते तारकर्ली मार्गापासून करण्याचा प्रस्ताव आहे. या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर फेरीबोट सेवा सुरू करण्याचा विचार करण्यात येत आहे. सध्या कर्ली ते तारकर्ली हा प्रवास रस्त्याने करण्यासाठी सुमारे दीड ते दोन तास लागतात. प्रस्तावित जलवाहतूक सेवा सुरू झाल्यास हाच प्रवास अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे राणे यांनी सांगितले. यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचू शकतो. विशेषतः तारकर्ली-देवबागसारख्या लोकप्रिय पर्यटनस्थळांना जोडणारी जलवाहतूक व्यवस्था विकसित झाल्यास किनारपट्टीवरील पर्यटन व्यवसायालाही फायदा होण्याची अपेक्षा आहे.

प्रवाशांसोबत कार आणि दुचाकीही नेण्याचा प्रस्ताव

प्रस्तावित फेरीबोटची संकल्पना सुमारे 20 मीटर लांब आणि 7.5 मीटर रुंद अशा एकेरी डेकच्या बोटीची आहे. संकल्पनात्मक आराखड्यानुसार या फेरीबोटमधून प्रवाशांसोबत चारचाकी आणि दुचाकी वाहनेही वाहून नेण्याची क्षमता प्रस्तावित आहे. त्यामुळे ही सेवा केवळ प्रवासी वाहतुकीपुरती मर्यादित न राहता वाहनांसह जलमार्गाने प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध करून देऊ शकते.

स्थानिक रोजगार आणि उद्योगालाही चालना

फेरीबोट प्रकल्पाचा सिंधुदुर्गच्या स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होण्याची अपेक्षा आहे. नवीन बोटींची बांधणी, त्यांचे कार्यान्वयन आणि नियमित देखभाल यामुळे स्थानिक जहाजबांधणी आणि सागरी अभियांत्रिकी क्षेत्राला काम मिळू शकते. खासगी क्षेत्राच्या सहभागातून जलवाहतूक अधिक नियमित आणि आधुनिक करण्याचाही प्रस्ताव आहे. फेरीबोट सेवा प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर पर्यटनाशी संबंधित व्यवसाय, वाहतूक, तांत्रिक सेवा आणि इतर पूरक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. एकूणच, अंतिम सर्वेक्षण आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा प्रस्ताव प्रत्यक्षात उतरल्यास सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील प्रवासाचा वेळ कमी करण्याबरोबरच जिल्ह्याच्या पर्यटन आणि सागरी अर्थव्यवस्थेला नवी गती मिळू शकते.

Shivsena News : विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द; सहा वर्षांची निवडणूक बंदी, ठाकरे गटाला मोठा धक्का

Web Title: Nitesh rane reviews modern ferry boat service proposal for sindhudurg water transport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • maharashtra
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Gondiya News: रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; बिबट्याचे मुंडके-धड झाले वेगळे! महालगाव शिवारातील घटना
1

Gondiya News: रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; बिबट्याचे मुंडके-धड झाले वेगळे! महालगाव शिवारातील घटना

Smart Meter Protest: ‘स्मार्ट मीटर हटवा, अन्यथा उखडून फेकू’; शेकापचे जयंत पाटील यांचा सरकारला इशारा
2

Smart Meter Protest: ‘स्मार्ट मीटर हटवा, अन्यथा उखडून फेकू’; शेकापचे जयंत पाटील यांचा सरकारला इशारा

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे
3

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे

Bhandara News:शेतकऱ्यांची फवारणीसाठी धावपळ; खरीप पिकांवर कीडरोगांचे आक्रमण!  वाढत्या खर्चामुळे शेतकरी हतबल
4

Bhandara News:शेतकऱ्यांची फवारणीसाठी धावपळ; खरीप पिकांवर कीडरोगांचे आक्रमण!  वाढत्या खर्चामुळे शेतकरी हतबल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.