Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smart Meter Protest: ‘स्मार्ट मीटर हटवा, अन्यथा उखडून फेकू’; शेकापचे जयंत पाटील यांचा सरकारला इशारा

Smart Meter Protest: स्मार्ट मीटर आणि वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावर शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. स्मार्ट मीटर हटवण्यात आले नाहीत तर ते उखडून फेकले जातील, असा इशारा शेकापचे नेते जयंत पाटील यांनी सरकारला दिला आहे. स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिले येत असल्याचा आरोप करत ती रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 07, 2026 | 06:35 PM
‘स्मार्ट मीटर हटवा, अन्यथा उखडून फेकू’; शेकापचे जयंत पाटील यांचा सरकारला इशारा

‘स्मार्ट मीटर हटवा, अन्यथा उखडून फेकू’; शेकापचे जयंत पाटील यांचा सरकारला इशारा

Follow Us
Follow Us:
  • वाढीव वीजबिलांवरून शेकाप आक्रमक
  • गणपतीनंतर रायगडात स्मार्ट मीटरविरोधात आंदोलन
  • वाढीव बिले रद्द करण्याची जयंत पाटील यांची मागणी
 

भारत रांजणकर, अलिबाग: महावितरणकडून वीज वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी राज्यभर स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात हे स्मार्ट मीटर ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहे की आर्थिक फटका देत आहेत, असा प्रश्न आता राज्यभरातील अनेक वीज ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे स्मार्ट मीटरच्या नावाखाली वीज ग्राहकांवर आर्थिक बोजा टाकला जात असल्याचा आरोप करत शेतकरी कामगार पक्षाने राज्य सरकार आणि महावितरणविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ बंद करावी, बसविलेले मीटर हटवावेत आणि वाढीव वीजबिले रद्द करावीत, अशी मागणी शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली.

Buldhana News: खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, महिनाभरापासून पावसाची दडी; तुषार सिंचनावर पीक जगवण्याची धडपड

स्मार्ट मीटरच्या कंत्राटातील वाढीव रकमेवर प्रश्न उपस्थित करताना अदानी एनर्जी सोल्युशन्सला सुरुवातीला सुमारे १३ हजार ८८८ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. त्यानंतर ही रक्कम जवळपास २७ हजार ७४० कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचा दावा शेकापने केला. बारामती-पुणे झोनमध्ये ३ हजार ३१४ कोटींच्या टेंडरऐवजी ६ हजार २९४ कोटी रुपयांची मंजुरी आणि प्रति मीटर दर ६ हजार ३१८ वरून ११ हजार ९९८ रुपयांपर्यंत वाढल्याचा मुद्दाही पक्षाने उपस्थित केला.

स्मार्ट मीटरसह संपूर्ण योजनेसाठी ३९ हजार ६०२ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी असून, महावितरण कर्जाद्वारे उभारणाऱ्या निधीचा भार भविष्यात ग्राहकांवर पडणार का, असा सवाल शेकापने केला. तसेच स्मार्ट मीटरमुळे पारंपरिक मीटर रीडिंग व बिल वितरणाची कामे कमी होऊन सुमारे २५ हजार स्थानिक तरुणांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त केली.

सरकारने स्मार्ट मीटरचे कंत्राट, दरवाढ, ग्राहकांची बिले आणि योजनेचा आर्थिक भार याबाबत संपूर्ण हिशेब जनतेसमोर मांडावा, अशी मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास गणपतीनंतर रायगडात आंदोलन करून स्मार्ट मीटर उखडून फेकण्याचा इशारा जयंत पाटील यांनी दिला. पुढे राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

पत्रकार परिषदेला आमदार बाळाराम पाटील, सुरेश खैरे, चित्रलेखा पाटील, ॲड. मानसी म्हात्रे, ॲड. गौतम पाटील, प्रदीप नाईक, सुरेश घरत, ॲड. साम्या कोरडे आदी उपस्थित होते.

Shivsena News : विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द; सहा वर्षांची निवडणूक बंदी, ठाकरे गटाला मोठा धक्का

Web Title: Shekap jayant patil warns government over smart meters demands cancellation of inflated electricity bills

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • electricity
  • maharashtra
  • smart meter

संबंधित बातम्या

Gondiya News: रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; बिबट्याचे मुंडके-धड झाले वेगळे! महालगाव शिवारातील घटना
1

Gondiya News: रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; बिबट्याचे मुंडके-धड झाले वेगळे! महालगाव शिवारातील घटना

Nitesh Rane: दीड-दोन तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत! सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा
2

Nitesh Rane: दीड-दोन तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत! सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे
3

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे

Bhandara News:शेतकऱ्यांची फवारणीसाठी धावपळ; खरीप पिकांवर कीडरोगांचे आक्रमण!  वाढत्या खर्चामुळे शेतकरी हतबल
4

Bhandara News:शेतकऱ्यांची फवारणीसाठी धावपळ; खरीप पिकांवर कीडरोगांचे आक्रमण!  वाढत्या खर्चामुळे शेतकरी हतबल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.