Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News:शेतकऱ्यांची फवारणीसाठी धावपळ; खरीप पिकांवर कीडरोगांचे आक्रमण!  वाढत्या खर्चामुळे शेतकरी हतबल

किडींच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे फवारणीच्या फेऱ्या वाढत आहेत आणि त्याचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर होत आहे. मात्र, सरसकट औषधफवारणीऐवजी नियमित पाहणी आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर केल्यास अनावश्यक खर्च टाळता येऊ शकतो.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 07, 2026 | 04:44 PM
Bhandara News:शेतकऱ्यांची फवारणीसाठी धावपळ; खरीप पिकांवर कीडरोगांचे आक्रमण!  वाढत्या खर्चामुळे शेतकरी हतबल
Follow Us
Follow Us:
  • अनियमित पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
  • फवारणीच्या वाढत्या फेऱ्यांमुळे कीटकनाशके, मजुरी आणि यंत्रसामग्रीचा खर्च वाढत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
  • सरसकट रासायनिक फवारणीऐवजी नियमित पाहणी आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
यंदा पावसाने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांची परीक्षा घेतली. पावसाचे आगमन लांबल्याने खरीप पेरणीला विलंब झाला. त्यानंतरही पावसात मोठे खंड पडले. परिणामी सध्या शेतात उभ्या असलेल्या धान, तूर, मूग, उडीद, कपाशी आणि वातावरणातील बदलांचा परिणाम जाणवू लागला आहे. विशेषतः कपाशी पिकात रसशोषक किडींच्या प्रादुर्भावाची स्थिती चिंताजनक होत असून, पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची फवारणीची लगबग सुरू आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमधील पावसाची उघडीप आणि ढगाळ वातावरण धानावरील तुडतुड्यांसारख्या किडींच्या वाढीस पोषक ठरू शकते. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पावसाचा खंड, त्यानंतरचे ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी वाढलेली आर्द्रता यामुळे धानपिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे.

Bhandara News: बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड विक्रीचा पर्दाफाश! तब्बल ७६,९०० हजारांचा मुद्देमाल जप्त

सोयाबीन, तूर आणि अन्य पिकांवरही पावसातील अनियमिततेचा परिणाम सोयाबीन आणि कडधान्य पिकांवरही होत आहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशकांच्या फवारणीवर भर न देता शेताची नियमित पाहणी, तण नियंत्रण, योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पीक संरक्षणाच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

फवारणीच्या फेऱ्या वाढल्या; खर्चाचा भार : किडीचा प्रादुर्भाव दिसताच अनेक शेतकरी कीटकनाशकांच्या फवारण्या करीत आहेत. काही शेतांमध्ये एकापेक्षा अधिक फेऱ्या झाल्याचे शेतकरी सांगतात. महागड्या कीटकनाशकांमुळे उत्पादन खर्च वाढत आहे.

Bhandara News: बाजारपेठेवर चढला जन्माष्टमीचा रंग! मूर्तिकारांची लगबग; पूजासाहित्य, सजावटीच्या वस्तूंनी बाजार फुलला

कपाशी आणि सोयाबीनसारख्या मोठ्या क्षेत्रावरील पिकांवर फवारणी करण्यासाठी मजूर मिळणेही शेतकऱ्यांसमोरचे मोठे आव्हान आहे. फवारणीच्या हंगामात एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांना मजुरांची आवश्यकता भासत असल्याने उपलब्ध मजुरांवर ताण येतो. त्यामुळे काही भागांत ड्रोनद्वारे फवारणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

८८ किडीचा प्रादुर्भाव दिसताच सरसकट रासायनिक फवारणी करण्याऐवजी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करावी, प्रादुर्भावाची तीव्रता तपासावी, अनावश्यक फवारण्या टाळाव्यात आणि शिफारशीत कीटकनाशकांचा योग्य मात्रेत वापर करावा.

Web Title: Kharif crops pest attack farmer spraying cost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • Bhandara
  • Farming
  • maharashtra

संबंधित बातम्या

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे
1

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे

Raj Thackeray: ‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो कधी जेवत होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला
2

Raj Thackeray: ‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो कधी जेवत होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला

Manoj Jarange Patil: ‘…तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद पडला पाहिजे’; जरांगे पाटलांचा इशारा
3

Manoj Jarange Patil: ‘…तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद पडला पाहिजे’; जरांगे पाटलांचा इशारा

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी
4

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.