(फोटो सौजन्य-AI एआय)
नवी दिल्ली इथे झालेल्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या 66व्या वार्षिक अधिवेशनासाठी दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी भारताची जागतिक ऑटो क्षेत्रातील भूमिका अधिक मजबूत होऊ शकते, असे नमूद केले. नवीन मुक्त व्यापार करारांमुळे भारतीय वाहन उद्योगाला परदेशी बाजारपेठांमध्ये पोहोच वाढवण्याची संधी मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
इलेक्ट्रिक वाहनांसह स्वच्छ इंधनांकडे वाढता कल
ऑटो क्षेत्रात ऊर्जा कार्यक्षमता, स्वच्छ इंधने, इलेक्ट्रिक मोबिलिटी, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत उत्पादन पद्धतींमुळे मोठे परिवर्तन होत आहे. वाढत्या चार्जिंग पायाभूत सुविधांमुळे इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकारही वाढत असून, यामुळे कंपन्यांसाठी नव्या व्यवसायाच्या संधी निर्माण होत आहेत.
गडकरींचा भारताला नंबर 1 ऑटो उद्योग बनवण्याचा विश्वास
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारताकडे मोठी बाजारपेठ, अभियांत्रिकी कौशल्य आणि उत्पादन क्षमता असल्याचे सांगितले. सध्या भारत जगातील 3ऱ्या क्रमांकाचा ऑटो उद्योग असून, भविष्यात नंबर 1 होण्याची क्षमता देशात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
5 दमदार इलेक्ट्रिक बाइक्स येत्या वर्षभरात होणार भारतात लाँच! पाहा कोणती बाईक ठरेल तुमच्यासाठी योग्य
गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहने, जैवइंधने आणि भविष्यात ग्रीन हायड्रोजनसारख्या पर्यायांवरही भर दिला. विशेषतः ट्रक आणि बस यांसारख्या अवजड वाहनांमध्ये स्वच्छ तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
वाहन सुरक्षा आणि जुन्या वाहनांवरही लक्ष
भारतामध्ये वाहन सुरक्षा सुधारण्यासाठी भारत एनसीएपी अंतर्गत 11 कंपन्यांच्या 30 पेक्षा अधिक मॉडेल्सना प्रमाणपत्र मिळाल्याचे गडकरी यांनी सांगितले. जुन्या वाहनांचे स्क्रॅपिंग, रेट्रोफिटिंग आणि प्रदूषण कमी करण्यासाठी वाहन कंपन्यांनी अधिक सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.






