नाशिक – रविवारी (२ जुलै) राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीतून (NCP) काही आमदारांना घेऊन अजित पवार शिंदे-फडणवीस (Shinde fadnavis) सरकारमध्ये सामील झाले आहेत. राज्यातल्या सत्तानाट्याच्या या सगळ्या घडामोडीनंतर सगळी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. एकिकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडली आहे. त्यामुळं पुन्हा पक्ष बांधणीसाठी शरद पवार आजपासून महाराष्ट्रात दौर करताहेत, आज शरद पवार (Sharad Pawar) नाशिकमधील येवल्यात सांयकाळी सभा होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीतील फुटीर गटांवर जोरदार हल्लाबोल केला.
मै तो अभी फायर हूँ…
दरम्यान, अजित पवारांनी आता तरी तुम्ही वयाचा विचार करता, कधी थांबणार की नाही असा सवाल उपस्थित केला होता. याला उत्तर देताना पवार म्हणले की, न टायर्ड हूँ…, न रीटायर्ड हूँ…, मै तो अभी फायर हूँ… असं प्रतिउत्तर शरद पवारांनी अजित पवारांना दिलं आहे. तसेच यावेळी त्यांनी निवृत्तीच्या टिकेवरुन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे उदाहरण देत, मै तो फायर हू… चांगला कामासाठी वयाचा काही संबंध नसतो, असा जोरदार घणाघात केला.
पटेल, भुजबळ यांच्या पराभवानंतरही…
पुढे बोलताना पवार म्हणाले की, प्रफुल्ल पटेलांच्या लोकसभेतील पराभवानंतरही मी त्यांना राज्यसभेवर पाठवलं. तसेच छगन भुजबळांच्या मुंबईतील पराभवानंतर मीच येवल्याचा पर्याय दिला होता. मी महाराष्ट्राबाहेर तीन दौर करणार आहे. नाशिक दौऱ्यासाठी वरुण राजाने स्वागत केले. अनेकजण म्हणत होते की, सुप्रियावर अन्याय होत आहे. पण मी लक्ष दिले नाही. बंडखोरी केलेले सगळे पराभूत होतील. ज्यांना नोटीशी आली ते घाबरले, मला कुणावरही वैयक्तिक टिका करायची नाही. असा टोला पवारांनी अजितदादा गटाला लगावला.
बंडखोरी पराभूत होतील
१० वर्ष पटेलांना केंद्रात मंत्रीपद दिलं. अजित पवारांनी गांभीर्यानं विचार करावा. भाजपात जाऊन पक्षाचं नुकसान केलं आहे. माझ्यासाठी आमदारांचा आकडा महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्याच्या वेळी नाशिकची वेगळी भूमिका होती. वस्तुस्थिती मांडण्यासाठी महाराष्ट्राबाहेर दौरे करणार आहे. पक्षाला बेकायदेशीर म्हणणारे आमदारकी, खासदारकी उपभोगताहेत. असं पवार म्हणाले. सुप्रियावर मीच अनेकवेळा अन्याय केला. पुढे बोलताना पवार म्हणाले की, ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांना किंमत मोजावी लागले. ते निवडणुकांत पराभूत होतील, अशी टिका शरद पवारांनी अदिजदादा गटांवर केली.
अनेक लोकं विचारधारणेशी एकनिष्ठ
भाजपाशी युतीचा निर्णय कधीच झाला नव्हता. नाशिकमधील अनेक लोकं माझ्या विचारधारणेशी सहमत आहेत. तसेच एकनिष्ठ आहेत. प्रफुल्ल पटेलांनीच माझ्या अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडला होता. भाजपासोबत युतीची चर्चा सुरु होती, पण निर्णय झाला नव्हता. राष्ट्रवादी अध्यक्ष निवडीचा निर्णय एकमताने झाला होता. विरोधकांना कमकवुत करण्याचा भाजपाचा प्रयत्न सध्या सुरु आहे. राज्यपातळीवरही पक्षसंघटना नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. लोकशाहीत विरोधी पक्षनेता महत्त्वाचा असतो. पण सध्या हे चित्र उलट दिसते, असं म्हणत शरद पवारांनी भाजपावर देखील टिका केली.