Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापुरात ‘नो व्हेईकल डे’ला आयुक्त डॉ. ओम्बासेंची पायी वाटचाल, पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना दिला प्रदूषणमुक्त जीवनशैलीचा संदेश

“नो व्हेईकल डे” निमित्त सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्त शहराचा संदेश देण्यासाठी अनोखा उपक्रम राबविला. त्यांनी आपल्या निवासस्थानापासून थेट महापालिका कार्यालयापर्यंत पायी चालत जाऊन कार्यालयीन कामकाज पार पाडले.

  • By विवेक
Updated On: Jun 01, 2026 | 09:56 PM
No Vehicle Day, No Vehicle Day celebrated in Solapur city, Dr. Sachin Ombase, Solapur Municipal Corporation, Solapur Municipal Commissioner Dr. Sachin Ombase,

No Vehicle Day, No Vehicle Day celebrated in Solapur city, Dr. Sachin Ombase, Solapur Municipal Corporation, Solapur Municipal Commissioner Dr. Sachin Ombase,

Follow Us
Follow Us:

सोलापूर : “नो व्हेईकल डे” निमित्त सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्त शहराचा संदेश देण्यासाठी अनोखा उपक्रम राबविला. त्यांनी आपल्या निवासस्थानापासून थेट महापालिका कार्यालयापर्यंत पायी चालत जाऊन कार्यालयीन कामकाज पार पाडले. विशेष म्हणजे, दिवसभराचे कामकाज संपल्यानंतर त्यांनी पुन्हा पायीच निवासस्थानी परतण्याचा निर्णय घेतला.

इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या उपक्रमाअंतर्गत तिसऱ्या सोमवारी महापौर विनायक कोंड्याल , उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीत चाकोते हे ई-बाईकवरून महापालिकेत आले.

वाहनांचा वाढता वापर, वायू प्रदूषण आणि इंधनाचा अपव्यय या पार्श्वभूमीवर डॉ. ओम्बासे यांनी स्वतः कृतीतून नागरिकांसमोर आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे ही काळाची गरज आहे. शक्य तिथे वाहनांचा वापर टाळून पायी चालणे, सायकलचा वापर करणे यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा संदेश त्यांनी दिला.

वाढते वायू प्रदूषण, इंधन बचत आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नियमित पायी चालण्याचे महत्त्वही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आयुक्तांच्या या उपक्रमाची शहरात सकारात्मक चर्चा होत असून, नागरिकांनीही अशा पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली आहे.

बुलढाणा शहरात काँग्रेसकडून भव्य आसूड मोर्चा, वाढती महागाई, इंधन टंचाई, नीटपेपरफुटी वरून काँग्रेसचे जोरदार आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचत व पर्यावरण संरक्षणाच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेकडून विविध पर्यावरणपूरक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. वाढते वायू प्रदूषण, जागतिक तापमानवाढ तसेच इंधनाच्या मर्यादित वापराची गरज लक्षात घेऊन महापौर विनायक कोंड्याल यांनी ‘नो व्हेईकल डे’ हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत महापालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक सोमवार ‘नो व्हेईकल डे’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.

२८ जूनला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम, सोलापुरात १.०६ लाख बालकांना पोलिओचे दोन थेंब

Web Title: No vehicle day celebrated in solapur city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 09:56 PM

Topics:  

  • Solapur
  • Solapur Municipal Corporation
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे
1

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात पाणी नसल्यामुळे मनसेचे पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 
2

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात पाणी नसल्यामुळे मनसेचे पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन
3

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी
4

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.