सौजन्य - नवराष्ट्र टीम
सोलापूर/ शेखर गोतसुर्वे : दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी सुरेश हसापुरे यांना देण्यात यावी, आशी मागणी दक्षिण सोलापूर तालूक्यातील काँग्रेसच्या कार्येकर्त्यानी पक्षाकडे केली आहे. मंगळवारी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश हसापुरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी काँग्रेस शहरध्यक्ष चेतन नरोटे यांची भेट घेत उमेदवारी मागणीपत्र दिले.
दक्षिण तालूक्यात सुरेश हसापुरे यांचे कार्य मोठे आहे. सर्व समाजबांधवांच्या हाकेला धावून येणारा नेता आहे. ग्रामीण विकासात्मक दृष्टीकोन असणारा नेता असल्याचे कार्यकर्त्यांनी शहरध्यक्ष नरोटे यांच्या समोर सांगितले. या पार्श्वभूमीवर सुरेश हसापुरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले क , नुकत्याचं झालेल्या लोकसभेत खासदार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यात भरीव कामगिरी केली आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघातून कार्यकर्त्यांनकडून माझ्या नावाची उमेदवारी मागणी करण्यात आली आहे. ग्रामीण विकासाचा दृष्टीकोन फक्त माझ्याकडेचं आहे. मी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सुभाष पाटोळे, संतोष पवार, मोतीलाल राठोड, राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष संगमेश बगले, जयशंकर पाटील, सरपंच बनसिद्ध बंन्ने, शिवलिंग बगळे, शाम व्हनमाने, सुधाकर जोकारे, अकबर मकानदार, माजी उप महापौर राजेंद्र कलंत्री, तिरुपती परकीपंडला, सुभाष वाघमारे, सागर उबाळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.