Navabharat Influencer Summit 2025 तुमची वाट पाहतोय, करा स्वतःला नॉमिनेट
Navabharat Influencer Summit 2025: हल्ली फक्त तरुणांमध्ये नाही तर प्रत्येक वयोगटामध्ये सोशल मीडिया वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. यातही अनेक जण असे असतात जे इतरांना त्यांच्या कंटेन्टमार्फत प्रभावित म्हणजेच इन्फ्ल्यूएंस करतात. या व्यक्तींना आपण Influencer म्हणून देखील ओळखतो.
सध्या अनेक Influencer मंडळी सोशल मीडियावर विविध कामाबाबत जनजागृती करत असतात. तसेच त्याच्या कामातून लाखो लोकं प्रभावित होतात. अशाच Influencer लोकांचा सन्मान Navabharat Influencer Summit 2025 मध्ये केला जाणार आहे. तसेच या कार्यक्रमात, विविध क्षेत्रातील मान्यवर सुद्धा सहभागी होणार आहेत. हा प्रतिष्ठित कार्यक्रम शनिवारी 11 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील विक्रोळी येथे स्थित Taj The Trees या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
नवभारत मीडिया समूह 11 ऑक्टोबर रोजी मुंबईत ‘नवभारत इन्फ्लुएंसर समिट 2025’ चे आयोजन करीत आहे. हा समारंभ सायंकाळी 6 वाजता ताज द ट्रीज येथे होणार असून यावर्षीची थीम आहे – ‘रिअल इन्फ्लुएंस, रिअल इम्पॅक्ट’. या समिटचा मुख्य उद्देश समाजावर सकारात्मक प्रभाव पाडणाऱ्या इन्फ्लुएंसरांना सन्मानित करणे हा आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे 25 विविध कॅटेगरींमध्ये दिले जाणारे पुरस्कार. यासाठी नवभारत मीडिया समूहाने इन्फ्लुएंसरांकडून नामांकन मागवले आहे. या कॅटेगरींमध्ये लेखक, मोटारवाहन आणि विमानचालन, क्रीडा, कॉमेडी, कवी, स्टोरीटेलर, चित्रपट समीक्षक, शिक्षणक्षेत्र, मनोरंजन अशा अनेक विभागांचा समावेश आहे.
जर तुम्ही सुद्धा लोकांना प्रभावित करत असाल तर तुम्ही सुद्धा Navabharat Influencer Summit 2025 चा भाग होऊ शकतात. अधिक माहितीसाठी https://navabharatmedia.in/influencersummit2025/ या लिंकवर क्लिक करा.
या समिटमध्ये आणखी अनेक क्षेत्रांतील इन्फ्लुएंसरनाही मंच मिळणार आहे. वित्त, फॅशन, तंत्रज्ञान, संगीत, आरोग्य, रिअल इस्टेट, पेरेंटिंग, पॉडकास्ट, कला, गेमिंग आणि पाळीव प्राणी यांसारख्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या इन्फ्लुएंसरांचा त्यांच्या योगदानाबद्दल गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय ‘उभरते इन्फ्लुएंसर’ ही विशेष श्रेणी ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे नव्या चेहऱ्यांना योग्य ओळख मिळणार आहे.