मुख्यमंत्री फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल (फोटो- ट्विटर)
एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची कृती ठरली कौतुकास्पद
देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या मोबाइलमध्ये लावले महाराष्ट्र गीत
सोशल मिडियावर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल
Devendra Fadnavis Viral Video: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेकदा आपल्या कृतीमुळे चर्चेत येत असतात. सध्या देखील एका कार्यक्रमात केलेल्या त्यांनी कृतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आंतरराष्ट्रीय बांबू दिनाच्या कार्यक्रमाचा समारोप पार पडला. एवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळआय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हे प्रकरण नेमके काय आहे ते जाणून घेऊयात.
आंतराष्ट्रीय बांबू दिनानिमित मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोपाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. महाराष्ट्र गीत लावून या कार्यक्रमाचा समारोप झाला. मात्र यावेळचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालयाने हा व्हिडीओ ‘एक्स’वर पोस्ट केला आहे.
नेमके काय घडले?
आंतराष्ट्रीय बांबू दिनाच्या कार्यक्रमाचा समारोप झाला. एवेळी या कार्यक्रमाचा समारोप ‘महाराष्ट्र गीता’ने झाला. मात्र काही तांत्रिक कारणाने महाराष्ट्र गीत वाजू शकले नाही. तरी या कार्यक्रमाचा समारोप ‘महाराष्ट्र गीता’ने झाला आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या मोबाइलमध्ये महाराष्ट्र गीत लावले आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी सगळे जण महाराष्ट्र गीतासाठी उभे राहिले. मात्र काही तांत्रिक समस्या आल्याने हे महाराष्ट्र गीत या ठिकाणी वाजू शकले नाही. गाण्यासाठी ठेवण्यात आलेल्या व्यवस्थेत अडचण निर्माण झाल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खिशातून मोबाइल बहेर काढला. प्रसंगावधान दाखवत स्वतः माइकजवळ फडणवीस पोहोचले. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या मोबाइलमध्ये महाराष्ट्र गीत सुरू केले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
Devendra Fadnavis: “ही सर्व धोरणे राज्याच्या विकास आणि…”; नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्वीट काय?
जय जय महाराष्ट्र माझा..
मुंबईत आज आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र गीत लावताना तांत्रिक अडचण आली. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखवत आपल्या मोबाईलमधून महाराष्ट्र गीत माईकसमोर लावले आणि समयसूचकतेचे उत्तम उदाहरण घालून दिले.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
सूक्ष्म आणि लघु उद्योग, अन्नप्रक्रिया उद्योग यासाठी जमिनीच्या काही मर्यादेत अकृषक परवान्याची अट काढण्याचा निर्णय सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित धोरणात्मक सुधारणा (पॉलिसी रिफॉर्म) बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सूक्ष्म आणि लघु उद्योगांना अकृषक परवाना मिळण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होऊन त्यांना वेळेत उद्योग सुरू करणे सोयीचे होणार आहे.