Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’बाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश; आता…

काही केंद्रांवर कुशल कामगारांचा अभाव असल्याने एका वाहनाला पाटी लावण्यासाठी एक तासापेक्षा जास्त कालावधी लागत आहे, अनेकांना मे महिन्यानंतरची वेळ आरक्षित करून देण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 19, 2025 | 01:28 PM
केंद्रांची संख्या वाढवावी,

केंद्रांची संख्या वाढवावी,

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : ‘जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एसएसआरपी) मुदतीत लावण्यासाठी तातडीने केंद्रांची संख्या वाढवावी,’ असे आदेश उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) रोजमेर्टा कंपनीला दिले आहेत. नोंदणी केलेल्या वाहनचालकांना मे, जून महिन्यापर्यंतच्या आरक्षित वेळ आरक्षित करून दिल्या आहेत. त्यामुळे मुदतीनुसार 30 एप्रिलनंतर कारवाई करायची किंवा नाही, असा पेच निर्माण झाल्याने ‘आरटीओ’ प्रशासनाने कंपनीला सूचना केल्या आहेत.

तसेच केंद्रांची नियुक्ती करताना कुशल कर्मचारी असतील, अशाच केंदांची नियुक्ती करावी, जेणेकरून दिवसभरात एका केंद्रावर 25-30 वाहनांना पाटी बसविले जाईल, असेही यावेळी बजावण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या निर्देशानुसार, जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी लावण्यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर वाहनचलाकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. आत्तापर्यंत सव्वा लाखांपेक्षा जास्त वाहनधारकांनी ऑनालाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी 40 हजारांहून अधिक वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी लावली आहे.

तसेच 65-70 हजार वाहनधारक प्रतीक्षेत आहेत, तर त्यांच्यासाठी कंपनीकडून 125 केंद्रांवर पाटी बसवून देण्यात येत आहे. मात्र, यातील काही केंद्रांवर कुशल कामगारांचा अभाव असल्याने एका वाहनाला पाटी लावण्यासाठी एक तासापेक्षा जास्त कालावधी लागत आहे, अनेकांना मे महिन्यानंतरची वेळ आरक्षित करून देण्यात आली आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनचालकांचा मनस्ताप होत तक्रारी प्राप्त झाल्याने ‘आरटीओ’ प्रशासनाने तातडीने केंद्र वाढविण्याबाबत सूचना केल्या आहेत.

आठवडाभरात केंद्रांची संख्या 500 पर्यंत जाईल

जुन्या वाहनधारकांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी लावण्यासाठी सुलभ आणि मुदतीत सेवा मिळवून देण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना केंद्र वाढविण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. येत्या आठवडाभरात केंद्रांची संख्या ५०० पर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले.

Web Title: Number of centers should be increased for hsrp says sub regional transport office nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 01:27 PM

Topics:  

  • High Security Registration Plate
  • HSRP
  • pune news

संबंधित बातम्या

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…
1

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?
2

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
3

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Maharashtra Rain Alert : मंत्रिमंडळ बैठक होणार..दोन दिवसांत पंचनामे करणार; पुण्याच्या पाऊस परिस्थितीवर अजित पवारांनी मांडले मत
4

Maharashtra Rain Alert : मंत्रिमंडळ बैठक होणार..दोन दिवसांत पंचनामे करणार; पुण्याच्या पाऊस परिस्थितीवर अजित पवारांनी मांडले मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.