
one died in bike accident in Kashil Pali road, Bike Accident, Accident,
उंब्रज/प्रतिनिधी: काशिळ ते पाली मार्गावर शिरगाव हद्दीत रस्त्यावर पडलेल्या डांबराच्या ढिगाला दुचाकी धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री घडली. शिवाजी पवार (वय ५०, रा. कोर्टी ता. कराड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
ही घटना रविवारी (दि. २४) रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी पवार हे दुचाकीवरून काशीळ-पाली मार्गाने जात असताना शिरगाव गावच्या हद्दीत रस्त्यावर पडलेल्या डांबराच्या ढिगाला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, ते सुमारे २५ फूट दूर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
सध्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराचा डांबर प्लांट शिरगाव परिसरात सुरू आहे. या कामासाठी वापरले जाणारे डांबर वाहतूक करताना अथवा टाकताना काही प्रमाणात रस्त्यावर पडत असल्याचे नागरिकांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. रस्त्यावर पडलेले डांबर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असून, याच निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करुन संताप व्यक्त केला. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली असून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. तसेच रस्त्यावर पडणारे डांबर, खडी व इतर साहित्य तात्काळ हटवून वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही केली आहे.
Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ ८०० फूट खोल दरीत कोसळली; 8 मित्रांची अकाली एक्झिट
अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर डिंगोरे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत हॉटेल जीवनदिपजवळ रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीचा अत्यंत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात दुचाकीवरील चारही तरुण जागीच ठार झाले आहेत. या घटनेमुळे डिंगोरे आणि मराडवाडी, आंबेदरा परिसरावर शोककळा पसरली असून, परिसरातून अत्यंत हळहळ व्यक्त होत आहे.
१) आशिष ढवळु भले (वय २४, रा. मराडवाडी, फाळुकदरा, डिंगोरे ता. जुन्नर), २) दिपक सखाराम भले (वय २८, रा. मराडवाडी, फाळुकदरा, डिंगोरे ता. जुन्नर) ३) शिवराम नारायण पारधी (वय २६, रा. आंबेदरा, डिंगोरे ता. जुन्नर) ४) खंडु नारायण भले (वय २५, रा. आंबेदरा, डिंगोरे ता. जुन्नर) अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विठ्ठलवाडी-पाथर्डी एसटी. बस (क्र. MH 20 BL 2983) ही माळशेज घाट मार्गे ओतूरच्या दिशेने येत होती. याच वेळी ओतूरच्या दिशेकडून डिंगोरेकडे एकाच दुचाकीवरून (स्प्लेंडर क्र. MH 14 MA 7849) चार तरुण चालले होते. महामार्गावरील हॉटेल जीवनदीपच्या थोडे पुढे येताच एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर अत्यंत जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला आणि चारही तरुण गंभीर जखमी होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले.
संतापजनक! बस स्टँडवर तरुणीसमोर माथेफिरूचे अश्लील कृत्य; तरुणीने व्हिडीओ बनवला अन्…