Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालवणी, अंबोजवाडी परिसरात एक हेक्टर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त

जिल्हा प्रशासनाने मोठी निष्कासन मोहीम राबवून २८० पेक्षा जास्त अतिक्रमण हटवून सुमारे १०००० चौ.मी. एवढी शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्याची मोहिम यशस्वीरित्या पार पाडली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 06, 2025 | 04:10 PM
नागपुरात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई; तब्बल 20 घरांवर चालवला बुलडोजर

नागपुरात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई; तब्बल 20 घरांवर चालवला बुलडोजर

Follow Us
Follow Us:
  • एक हेक्टर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त
  • २८० पेक्षा जास्त अतिक्रमण हटवण्यात आले
  • २०११ पर्यंतच्या झोपडयांना सशुल्क संरक्षण
मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील मौजे मालवणी क्षेत्रातील न.भू.क्र. २६७० व १९१६ या शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण, तसेच संरक्षित कांदळवन (मॅग्रोव्ह) क्षेत्राला लागून असलेला भराव आणि कत्तल थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी निष्कासन मोहीम राबवून २८० पेक्षा जास्त अतिक्रमण हटवून सुमारे १०००० चौ.मी. एवढी शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्याची मोहिम यशस्वीरित्या पार पाडली आहे.

महाराष्ट्र शासनाने २००० पर्यतच्या झोपड्यांना संरक्षण दिले असून तद्नंतर पुन्हा २०११ पर्यंतच्या झोपडयांना सशुल्क संरक्षण दिले आहे. तथापि, यापुढेही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये मोफत घर मिळवण्याच्या उद्देशाने शासकीय जमिनीवर अतिक्रमणे करण्याची प्रवृत्ती बळावलेली आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या तक्रारी देखील प्राप्त होत होत्या. याची गंभीर दखल प्रशासनाने घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर व मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सर्व संबंधित यंत्रणांना कारवाईचे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का), पश्चिम उपनगरे गणेश मिसाळ आणि प्रभारी उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) मालाड विनायक पाडवी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मालवणी पोलीस ठाणे यांच्या मदतीने ३ व ४ नोव्हेंबर २०२५ रोजी ही मोहीम हाती घेतली.

आला रे आला! सावजाच्या मागे आला बिबट्या अन्…; अंगणात बसलेला चिमुकला बचावला, पहा थरारक Video

या कारवाईत सुमारे २८० झोपड्या निष्कासित करण्यात आल्या असून, अंदाजे १०००० चौ.मी. झोपडीखालील क्षेत्र मोकळे करण्यात आले आहे. तसेच, अली तलाव या नैसर्गिक तलावाच्या परिसरातील अतिक्रमणे निष्कासित करुन तलाव क्षेत्र अतिक्रमणमुक्त केले आहे. विशेष म्हणजे यापैकी काही अतिक्रमणे २ ते ३ मजल्यांची पक्की बांधकामे होती. अतिक्रमण निष्कासित करतानाची निष्कासन कामगारांची कामगिरी देखील उल्लेखनीय आहे. तसेच अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी प्रशासनाने प्रथमच सॅटेलाईट छायाचित्राची मदत घेऊन २०११ नंतरची अतिक्रमण शोधून अतिक्रमणे निष्कासित करण्याची कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे यापुढे अतिक्रमणे केल्यास ती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन निष्कासित केले जातील व या नुकसानीची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अतिक्रमणधारक यांची राहील अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शासकीय जमीन आणि संरक्षित वन क्षेत्रांचे अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही आणि अशा प्रकारची कारवाई भविष्यातही सातत्याने सुरू राहील, असे अपर अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) गणेश मिसाळ यांनी कळविले आहे.

Mumbai: महापालिका वाढवणार आरोग्यसेवेची गुणवत्ता! मुंबईतील रुग्णालयांमध्ये ६ ते २० नोव्हेंबरदरम्यान ‘स्वच्छता पंधरवडा’

Web Title: One hectare of government land in the malvani ambojwadi area is encroachment free

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 06:44 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
1

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित
2

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
3

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ
4

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.