मुंबईच्या वांद्र्यात भीषण आग, 25 झोपड्या जळून खाक
Mumbai Bandra Fire News In Marathi: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचदरम्यान आता मुंबईतील वांद्रे परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. या परिसरातील झोपड्यांना आग लागली आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळत आहे. आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रा पूर्व भागात शनिवारी (4 जानेवारी ) भीषण आगीची घटना घडली. मुंबईतील वांद्रे पूर्व भागातील भारत नगर भागात भीषण आग लागली आहे. भारतनगर परिसरातील खाडी किनाऱ्यावरील तिवराचे जंगल आणि कचराकुंडीला मोठी आग लागली आहे. भारतनगर परिसरात लागलेल्या आगीमुळे धुराचे प्रचंड मोठं लोट पसरले आहे. आग लागल्याची माहिती परिसरात बघ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या भीषण आग लागल्याच्या घटनेनंतर ३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
आपत्कालीन सेवांनी तातडीने प्रतिसाद देत अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पुढील नुकसान टाळण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अथक प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अद्याप समजले नसून परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर तपास केला जाईल. आगीमुळे बाधित कुटुंबांना आधार मिळत आहे कारण अधिकारी घटना आटोक्यात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न करत आहेत.
तर दुसरीकडे उत्तर चीनमधील एका बाजारपेठेत शनिवारी लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. तेथील सरकारी माध्यमांनी ही माहिती दिली. क्यूओसी जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याचा हवाला देत त्यांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे की झांगजियाकौ शहरातील लिगुआंग मार्केटमध्ये शनिवारी दुपारी आग लागली आणि स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली.