Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावरकरांच्या जयंतीसाठी अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवल्याने विरोधक आक्रमक; नेतेमंडळी म्हणतात…

नव्या संसद भवनाचे (New Parliament) उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. त्यात आता दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील (Maharashtra Sadan) स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 29, 2023 | 02:21 PM
सावरकरांच्या जयंतीसाठी अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवल्याने विरोधक आक्रमक; नेतेमंडळी म्हणतात…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : नव्या संसद भवनाचे (New Parliament) उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. त्यात आता दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील (Maharashtra Sadan) स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवण्यात आला. त्यामुळे राज्यातील काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत… pic.twitter.com/da8J6VGGpr — Rohit Pawar (@RRPSpeaks) May 28, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले. त्यामध्ये म्हटले की, ‘महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे #chocklate_boy आता गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत दाखवतील का?, असे त्यांनी सांगितले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसमोर हटवले जातात ही चिंतेची बाब – जयंतराव पाटील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समोर बसलेले असताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी… pic.twitter.com/0Z35rloilC — Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 29, 2023

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसमोर पुतळे हटवले जातात ही चिंतेची बाब : जयंत पाटील

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समोर बसलेले असताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे हटवले जातात ही चिंतेची बाब आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

Web Title: Opposition is aggressive after removing the statues of ahilya devi and savitribai phule on the occasion of savarkars birth anniversary nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2023 | 02:21 PM

Topics:  

  • maharashtra
  • New Parliament Building
  • political news

संबंधित बातम्या

शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी
1

शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी

Parth Pawar clean chit : राज्यसभेवर पाठवण्याची घाई म्हणून..; अंंजली दमानिया यांचा चढला पारा
2

Parth Pawar clean chit : राज्यसभेवर पाठवण्याची घाई म्हणून..; अंंजली दमानिया यांचा चढला पारा

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी
3

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी
4

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.