पंढरपूर : यंदाच्या आषाढी यात्रेमध्ये (Ashadhi Yatra 2023) पंढरपुरात राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. ‘आरोग्याची वारी , पंढरीच्या दारी’ या संकल्पनेवर आधारित 28 आणि 29 जून रोजी पंढरपुरात (Pandharpur Devotee) सुमारे 20 लाख भाविकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथके मागविण्यात येणार आहे.
पंढरपुरात 3 ठिकाणी हे आरोग्य शिबिर होईल. यामध्ये आरोग्य यंत्रणेसह सकस आहार वारकरी भक्तांना दिला जाणार आहे. याबाबत आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. आषाढी यात्रेमध्ये राज्य शासनाचे विविध कार्यक्रम आजपर्यंत राबवले गेले. मात्र, आरोग्य शिबिरासारखा लोकोपयोगी उपक्रम प्रथमच पंढरपूर येथे घेतला जात आहे.