दुबई एअरपोर्ट अनिश्चित काळासाठी बंद (फोटो- ट्विटर)
इराणचा काही दिवसांपासून दुबईवर मोठे हल्ले
दुबई एअरपोर्ट अनिश्चित काळासाठी बंद
मिडल ईस्टमध्ये वाढला तणाव
Iran Attack On Dubai International Airport Video Viral: इराण विरुद्ध अमेरिका अन् इस्त्रायल युद्धाचा आज 7 वा दिवस आहे. त्याचा फटका अनेक देशांना बसला आहे. इराणने तेल वाहतूक बंद केली आहे. अनेक नागरिक परदेशात अडकून पडले आहेत. इराणने दुबई, कतार, कुवेत देशांवर देखील हल्ला केला आहे. आता पुन्हा एकदा इराणने दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर भीषण हल्ला केला आहे. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.
दुबई एअरपोर्ट जगातील एक व्यस्त एअरपोर्ट आहे. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे हे एअरपोर्ट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. या एअरपोर्टवर इराणने पुन्हा एकदा भीषण हल्ला केल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामुळे आता दुबई एअरपोर्ट बंद झाले आहे.
दुबई इंटरनेशनल एयरपोर्ट के ऊपर धुआं। हमले की अपुष्ट खबर। अधिकारियों ने कुछ गिरने की पुष्टि की लेकिन किसी भी नुकसान से इनकार। pic.twitter.com/ycArSjprC1 — Narendra Nath Mishra (@iamnarendranath) March 7, 2026
इराणने एक मिसाईल दुबई एअरपोर्टवर डागळे मात्र ते हवेतच नष्ट करण्यात आले. मात्र त्याच्यामुळे झालेला धूर हा व्हीडिओत कैद झाला आहे. त्यानंतर सुरक्षेच्या कारणांमुळे दुबई एअरपोर्टवरील उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होणार आहेत. दरम्यान दुबई एअरपोर्ट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे.
World War 3: ‘तेहरानमध्ये आग आणि विनाश!’ इस्रायलच्या 80 फायटर जेट्सचा इराणवर महाविध्वंसक प्रहार
‘तेहरानमध्ये आग आणि विनाश!’
पश्चिम आशियातील संघर्ष आता अशा वळणावर पोहोचला आहे जिथून मागे फिरणे अशक्य दिसत आहे. शुक्रवारी पहाटे इस्रायली हवाई दलाने (IAF) इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला. ८० हून अधिक अत्याधुनिक लढाऊ विमानांनी इराणची राजधानी तेहरानच्या आकाशात झेप घेत अणुप्रकल्प आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या मुख्य केंद्रांना लक्ष्य केले. या हल्ल्याने केवळ इराणच नाही, तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले असून महायुद्धाची टांगती तलवार अधिक धारदार झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US military bases: जगाचा नकाशा की अमेरिकेची युद्धछावणी? 80 देशांत पसरलेल्या 800 US लष्करी तळांच्या चक्रव्यूहाचे रहस्य आले समोर
इस्रायलने आपल्या या मोहिमेत अत्यंत अचूकतेने इराणच्या लष्करी ताकदीचा कणा मोडण्याचा प्रयत्न केला आहे. तेहरानमधील इमाम हुसेन विद्यापीठ, जे IRGC चे प्रमुख प्रशिक्षण केंद्र मानले जाते, त्यावर भीषण बॉम्बफेक करण्यात आली. इस्रायली लष्कराच्या दाव्यानुसार, इराणच्या भूमिगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र साठवण सुविधा आणि कमांड सेंटर्स या हल्ल्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.






