Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahu Dam Jawali News: महू धरणाचे 700 कोटी पाण्यात? शेतीऐवजी ‘वाकळा’ धुण्यासाठी पाण्याचा वापर होत असल्याचा संताप

जावळी तालुक्यातील महू धरणाची उभारणी सुमारे 30 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. या धरणासाठी सुमारे 700 कोटींहून अधिक रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे सांगितले जाते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 26, 2026 | 12:41 PM
शेतीऐवजी 'वाकळा' धुण्यासाठी पाण्याचा वापर होत असल्याचा संताप

शेतीऐवजी 'वाकळा' धुण्यासाठी पाण्याचा वापर होत असल्याचा संताप

Follow Us
Close
Follow Us:

 

  • महू धरणाचे ७०० कोटी पाण्यात?
  • शेतीऐवजी ‘वाकळा’ धुण्यासाठी पाण्याचा वापर होत असल्याचा संताप
पाचगणी/इम्तियाज मुजावर : जावळी तालुक्यातील महू धरणाबाबत एक धक्कादायक वास्तव समोर येत असून, कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या धरणाचे पाणी शेतीसाठी न पोहोचता स्थानिक स्तरावर वाकळा धुण्यासाठी वापरले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. गेल्या तब्बल 30 वर्षांपासून शेतकरी या धरणाच्या पाण्याची वाट पाहत असताना, शेतशिवारात अद्यापही पाणी पोहोचलेले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जावळी तालुक्यातील महू धरणाची उभारणी सुमारे 30 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. या धरणासाठी सुमारे 700 कोटींहून अधिक रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे सांगितले जाते. या प्रकल्पामुळे परिसरातील शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, तसेच स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र एवढा मोठा खर्च करूनही आजतागायत या धरणाच्या सिंचन प्रकल्पाचे काम शंभर टक्के पूर्ण झालेले नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

या धरणाच्या पाण्याची अपेक्षा करत करत जावळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या दोन पिढ्या निघून गेल्या. तरीदेखील आजपर्यंत शेतशिवारामध्ये या धरणाचे पाणी पोहोचलेले नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांना अजूनही पावसाच्या पाण्यावर किंवा अन्य पर्यायी साधनांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे शेतीचे नियोजन करणे कठीण होत असून, आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

म्हसवड पालिका प्रशासनाविरोधात सफाई कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरु

धरणामध्ये पाणी उपलब्ध असतानाही त्याचा शेतीसाठी अपेक्षित वापर होत नसल्याने ग्रामस्थांकडून प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे, धरणाचे पाणी शेतीसाठी न वापरता काही ठिकाणी वाकळा धुण्यासाठी वापरले जात असल्याचा आरोप होत असल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे. “धरणाचे पाणी शेतीसाठी कधी वापरले जाणार, की ते फक्त वाकळा धुण्यासाठीच वापरले जाणार आहे का?” असा संतप्त सवाल आता शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून उभारलेले धरण आजही पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण का झाली नाहीत, तसेच सिंचन व्यवस्था पूर्ण करण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार, याबाबत स्पष्टता देण्याची मागणी आता जोर धरत आहे.

महू धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा करत करत दोन पिढ्या निघून गेल्या, तरीही शेतशिवारात पाणी पोहोचलेले नाही, ही वस्तुस्थिती प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. धरणाचे पाणी शेतीसाठी नेमके कधी उपलब्ध होणार आणि शेतकऱ्यांची प्रतीक्षा कधी संपणार, याकडे आता जावळी तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

MSRTC News : राज्यातील अवैध वाहतुकीमुळे एसटी संकटात? अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Web Title: Outrage over water being used to wash quilts instead of for agriculture

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : तुषार दोशी ‘दोषी’ नाहीच? निलंबन टाळून सातारा पोलीस अधिक्षक कार्यालयात दाखल
1

Satara News : तुषार दोशी ‘दोषी’ नाहीच? निलंबन टाळून सातारा पोलीस अधिक्षक कार्यालयात दाखल

कराड-चिपळूण मार्गावरील अवजड वाहतूक ६० दिवसांसाठी वळवली; धांडे पुलाच्या पुनर्बांधणीमुळे वाहतुकीत मोठा बदल
2

कराड-चिपळूण मार्गावरील अवजड वाहतूक ६० दिवसांसाठी वळवली; धांडे पुलाच्या पुनर्बांधणीमुळे वाहतुकीत मोठा बदल

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात वसुलीला वेग; ओझर्डेत थकीत नळ कनेक्शन तोडणीची धडक मोहीम
3

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात वसुलीला वेग; ओझर्डेत थकीत नळ कनेक्शन तोडणीची धडक मोहीम

म्हसवड पालिका प्रशासनाविरोधात सफाई कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरु
4

म्हसवड पालिका प्रशासनाविरोधात सफाई कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.