Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar News : पोलिस महापालिका आमनेसामने! इमारती-चौक्यांच्या भाड्यापोटी कोटींच्या कोटी उड्डाणे; हाणामारीचा वाद महासभेत

Vasai Virar News : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाकडे महापालिकेच्या इमारती, चौक्या आणि मोकळ्या जागांच्या भाड्यापोटी तब्बल ११ कोटी २८ लाख रुपयांची मोठी थकबाकी बाकी आहे. दुसरीकडे, पोलिसांनी विविध कारणांसाठी पुरवलेल्या बंदोबस्तापोटी ५ कोटी २० लाखांच्या बिलाची मागणी केली असता, महापालिकेने ती स्पष्टपणे फेटाळून लावली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 14, 2026 | 12:34 PM
पोलिस महापालिका आमनेसामने! ( सौजन्य - सोशल मीडिया )

पोलिस महापालिका आमनेसामने! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • पोलिस महापालिका आमनेसामने!
  • इमारती-चौक्यांच्या भाड्यापोटी कोटींच्या कोटी उड्डाणे
  • दोघांमधील हाणामारीचा वाद महासभेत
Vasai Virar News : इमारती, चौक्या आणि मोकळ्या जागांच्या भाड्यापोटी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाकडे तब्बल ११ कोटी २८ लाख ७७ हजार रुपयांची थकबाकी असतानाच, दुसरीकडे पोलिसांनीही बंदोबस्त शुल्कापोटी ५ कोटी २० लाखांची मागणी पालिकेकडे केली आहे. महापालिकेने पोलिसांचा हा दावा थेट फेटाळून लावल्याने दोन्ही यंत्रणांमध्ये आर्थिक देण्याघेण्यावरून वाद निर्माण झाला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी आणि वसुलीसाठी महापालिकेने हा संपूर्ण प्रस्ताव महासभेसमोर ठेवला आहे. ( Vasai Virar New ) 

Vasai Police : क्रिकेट-फुटबॉलवर चालत होता कोटींचा सट्टा! वसई पोलिसांनी आवळल्या गोव्यातील मास्टरमाइंड्सच्या मुसक्या

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर सरुवातीच्या कालात आयुक्तालय आणि ठाण्यांसाठी स्वतःची स्वतंत्र जागा नसल्याने मिरा-भाईंदर महापालिकेने आपल्या ताब्यातील इमारती, आरक्षित भूखंड आणि मोकळ्या जागा पोलीस विभागाला भाडेतत्त्वावर दिल्या. यामध्ये शांतानगर येथील श्री पद्मसागर सुरीजी भवनातील मुख्य आयुक्तालय, आरक्षण क्र. २४९ मधील उपायुक्त कार्यालय, नवघर आणि काशीगाव पोलिस ठाण्यांचा समावेश होता.

या पार्श्वभूमीवर थकबाकी वसुली, घोडबंदर येथे वाहनांसाठी नवीन जागा देणे आणि आरक्षण क्र. २४९ मधील कार्यालय कायमस्वरूपी हस्तांतरित करणे यासंबंधीचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यात आला असून, आता लोकप्रतिनिधी यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

मोकळ्या जागांचे भाडे तब्बल ६ कोटी

या इमारतीचे एकूण भाडे ६ कोटी २४ लाख रुपये निश्चित झाले होते. त्यापैकी महापालिकेला केवळ ३ कोटी ६९ लाख रुपये मिळाले असून, २ कोटी ५५ लाख ३६ हजार रुपये अद्याप थकीत आहेत. याशिवाय मिरा रोड, घोडबंदर आणि काशीगाव येथे जप्त वाहने ठेवण्यासाठी दिलेल्या मोकळ्या जागांचे भाडे तब्बल ६ कोटी ९६ हजार रुपये बाकी आहे. विविध पोलिस चौक्यांचे १० लाख २२ हजार रुपये भाडे आणि आयुक्तालय व उपायुक्त कार्यालयासाठी महापालिकेने केलेल्या फर्निचर खर्चाचे १ कोटी ८२ लाख २२ हजार रुपयेही वसूल झालेले नाहीत. असा एकूण मिळून ११ कोटी २८ लाख ७७हजार ३८९ रुपयांचा आकडा महापालिकेच्या प्रस्तावात मांडण्यात आला आहे.

बंदोबस्त शुल्काची मागणी महापालिका प्रशासनाकडून नामंजूर

दरम्यान, शहरातील अतिक्रमण, फेरीवाले, बेकायदा बांधकामांवरील कारवाई आणि निवडणुकांच्या वेळी पुरवलेल्या सुरक्षेपोटी पोलिसांनी महापालिकेकडे ५ कोटी २० लाख ६६ हजार रुपयांचे बिल सादर केले होते. मात्र, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ४८३ आणि उच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा संदर्भ देत महापालिकेने हे शुल्क देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे आणि महापालिकेच्या अधिकृत कारवाईदरम्यान बंदोबस्त पुरवणे हे पोलिसांचे वैधानिक कर्तव्य असून त्यासाठी महापालिकेवर अतिरिक्त भार टाकता येणार नाही, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे.

Nalasopara Navratri Violence : नालासोपाऱ्यात नवरात्रोत्सवाला गालबोट! दोन गटांत तुफान हाणामारी, महिलांसह 10 जण जखमी

Web Title: Mira bhayandar vasai virar police commissionerate faces 11 crore dues dispute ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • Vasai Virar Police

संबंधित बातम्या

Mira Bhayandar: मिरा रोड-भाईंदर रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा? खासदार नरेश म्हस्केंनी मांडल्या ‘या’ ८ मागण्या
1

Mira Bhayandar: मिरा रोड-भाईंदर रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा? खासदार नरेश म्हस्केंनी मांडल्या ‘या’ ८ मागण्या

Bus Fare Hike: अरे देवा! बसप्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट २ ते १४ रुपयांनी महागणार, तर एसी बसच्या…; प्रवाशांच्या अडचणीत वाढ
2

Bus Fare Hike: अरे देवा! बसप्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट २ ते १४ रुपयांनी महागणार, तर एसी बसच्या…; प्रवाशांच्या अडचणीत वाढ

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती
3

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.