Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar: मिरा रोड-भाईंदर रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा? खासदार नरेश म्हस्केंनी मांडल्या ‘या’ ८ मागण्या

खासदार म्हस्के यांनी २५ सप्टेंबर २०२६ रोजी पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक, चर्चगेट, मुंबई यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात आठ प्रमुख मागण्यांचा अजेंडा मांडला आहे. स्थानकांवरील गर्दीचे व्यवस्थापन, महिला व बालकांसाठी सुविधा इत्यादी मागण्या पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 14, 2026 | 11:46 AM
Mira Bhayandar: मिरा रोड-भाईंदर रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा? खासदार नरेश म्हस्केंनी मांडल्या 'या' ८ मागण्या

Mira Bhayandar: मिरा रोड-भाईंदर रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा? खासदार नरेश म्हस्केंनी मांडल्या 'या' ८ मागण्या

Follow Us
Follow Us:
  • मिरा रोड-भाईंदर रेल्वे स्थानकांच्या समस्यांवर खासदारांचा पुढाकार
  • खासदार नरेश म्हस्केंनी पश्चिम रेल्वेला दिले निवेदन
  • प्रवासी डेक, हिरकणी कक्ष, सरकते जिने, अतिरिक्त एसी लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यांसाठी मागणी
मिरा-भाईंदर | प्रतिनिधी : विजय काते

मिरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांच्या विविध समस्या, अपुऱ्या सुविधा आणि प्रलंबित विकासकामांकडे लक्ष वेधत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश गणपत म्हस्के यांनी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे आठ प्रमुख मागण्यांचा अजेंडा मांडला आहे. स्थानकांवरील गर्दीचे व्यवस्थापन, महिला व बालकांसाठी सुविधा, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांची सोय, अतिरिक्त एसी लोकल, एक्सप्रेस गाड्यांचे थांबे तसेच तिकीट खिडक्या आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा वाढविण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Accident News: ‘हेल्प… हेल्प…’च्या आर्त हाका! इम्पेरियल हाइट्सच्या आगीत दोन महिलांचा मृत्यू

खासदार म्हस्के यांनी २५ सप्टेंबर २०२६ रोजी पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक, चर्चगेट, मुंबई यांना पत्र पाठवून या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. मिरा रोड आणि भाईंदर ही पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्त्वाची व गजबजलेली स्थानके असून, येथून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुकर आणि सोयीस्कर करण्यासाठी प्रलंबित कामांना गती देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

मिरा रोड स्थानकावरील प्रवासी डेक तातडीने खुला करा

मिरा रोड रेल्वे स्थानकावर दक्षिण ते उत्तर दिशेने प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी पादचारी पुलाला जोडणारा नवीन प्रवासी डेक तयार करण्यात आला आहे. मात्र, या डेकचे उर्वरित काम पूर्ण करून तो अद्याप प्रवाशांसाठी खुला करण्याची आवश्यकता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. हे काम लवकर पूर्ण करून डेक प्रवाशांसाठी खुला केल्यास स्थानकावरील गर्दीचे विभाजन होण्यास मदत होईल आणि प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

महिला आणि बालकांसाठी हिरकणी कक्षाची मागणी

लहान बालकांसह प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. ही गैरसोय दूर करण्यासाठी मिरा रोड आणि भाईंदर या दोन्ही स्थानकांवर स्वतंत्र, सुरक्षित आणि स्वच्छ ‘हिरकणी कक्ष’ अर्थात बेबी फीडिंग व केअर रूम उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. या सुविधेमुळे स्तनदा माता आणि लहान बालकांसह प्रवास करणाऱ्या महिलांना आवश्यक गोपनीयता आणि सोयी उपलब्ध होऊ शकतील.

भाईंदर स्थानकावर सरकते जिने किंवा लिफ्ट बसवा

भाईंदर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ वर जाण्या-येण्यासाठी प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता या ठिकाणी सरकते जिने (एस्केलेटर) बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. तांत्रिक कारणांमुळे एस्केलेटर बसविणे शक्य नसल्यास ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि दिव्यांग प्रवाशांसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

गर्दीच्या वेळेत अतिरिक्त एसी लोकल सुरू करा

मिरा-भाईंदर परिसरातून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत एसी लोकलमध्येही मोठी गर्दी होत असल्याने या मार्गावर अतिरिक्त एसी लोकल फेऱ्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन लोकल सेवांचे नियोजन आणि उपलब्ध सुविधांमध्ये वाढ करण्याची आवश्यकता या मागणीच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आली आहे.

भाईंदर स्थानकावर पाच एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी

भाईंदर रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळाल्यास परिसरातील प्रवाशांना मुंबईतील इतर स्थानकांवर जाण्याची गरज कमी होऊन वेळ आणि प्रवासाचा त्रास वाचू शकतो. या पार्श्वभूमीवर खालील पाच एक्सप्रेस गाड्यांना भाईंदर येथे थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • – बांद्रा-दिल्ली एक्सप्रेस
  • – बांद्रा-वेरावल एक्सप्रेस
  • – बांद्रा-अहमदाबाद एक्सप्रेस
  • – दादर-भुज एक्सप्रेस
  • – बांद्रा-भावनगर एक्सप्रेस
या गाड्यांना भाईंदर येथे थांबा देण्याबाबत रेल्वे प्रशासनाने व्यवहार्यता तपासून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई ते कटरा विशेष प्रीमियम ट्रेन सुरू करण्याची सूचना

माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी तसेच जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी मुंबई आणि उपनगरांतून मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक प्रवास करतात. या प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईहून कटरा येथे जाणारी राजधानी किंवा शताब्दी एक्सप्रेससारखी विशेष प्रीमियम ट्रेन सुरू करण्याची सूचना खासदारांनी केली आहे. अशा सेवेमुळे भाविकांना आणि पर्यटकांना प्रवासाचे अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होऊ शकतील, अशी अपेक्षा आहे.

तिकीट खिडक्या आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधेत वाढ

भाईंदर स्थानकावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागत असल्याची समस्या पत्रातून मांडण्यात आली आहे. प्रवाशांचा वेळ वाचविण्यासाठी तिकीट खिडक्यांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय मिरा रोड आणि भाईंदर या दोन्ही स्थानकांवर स्वच्छ व परवडणारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वॉटर व्हेंडिंग मशीन बसविण्याची मागणीही करण्यात आली आहे. या सुविधांमुळे प्रवाशांना स्थानकांवरच पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होण्यास मदत होईल.

कचऱ्यापासून CBG निर्मितीसाठी टास्क फोर्स स्थापन करा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश

पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष

मिरा रोड आणि भाईंदर स्थानकांवरील प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी या आठही मागण्यांचा गांभीर्याने विचार करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी विनंती खासदार म्हस्के यांनी पश्चिम रेल्वेच्या महाप्रबंधकांकडे केली आहे. तसेच या मागण्यांवर झालेल्या कार्यवाहीचा प्रगती अहवाल आपल्या कार्यालयाला कळविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

आता पश्चिम रेल्वे प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते, कोणत्या सुविधांना प्राधान्य देते आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी काय पावले उचलते, याकडे मिरा रोड, भाईंदर आणि परिसरातील रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Mira road bhayandar railway stations update mp naresh mhaske raises these 8 key demands hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • mira bhayandar
  • Naresh Mhaske
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Vasai Virar News : पोलिस महापालिका आमनेसामने! इमारती-चौक्यांच्या भाड्यापोटी कोटींच्या कोटी उड्डाणे; हाणामारीचा वाद महासभेत
1

Vasai Virar News : पोलिस महापालिका आमनेसामने! इमारती-चौक्यांच्या भाड्यापोटी कोटींच्या कोटी उड्डाणे; हाणामारीचा वाद महासभेत

वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश
2

वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश

Exclusive Navarashtra-Navadurga: शाळेच्या चौकटीत न बसणाऱ्या मुलांसाठी उघडली प्रगतीची नवी दारं! ‘राशी पीओएस फाउंडेशन’ची कहाणी
3

Exclusive Navarashtra-Navadurga: शाळेच्या चौकटीत न बसणाऱ्या मुलांसाठी उघडली प्रगतीची नवी दारं! ‘राशी पीओएस फाउंडेशन’ची कहाणी

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावरील ओपन जिमला गंज! नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, दुरुस्ती कधी होणार?
4

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावरील ओपन जिमला गंज! नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, दुरुस्ती कधी होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.