
महसूल विभागात 122 जागांसाठी कोतवाल भरती ( सौजन्य - सोशल मीडिया )
या भरतीसाठी उमेदवारांना संबंधित तहसीलदार कार्यालयात जाऊन विहित नमुन्यातील अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष ऑफलाइन सादर करावा लागेल, टपाल अथवा ई-मेलद्वारे आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. १७ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत शासकीय सुट्टया वगळून अर्ज स्वीकारले जातील, त्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा १५ नोव्हेंबर २०२६ रोजी घेतली जाणार आहे. सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमुना मिळवण्यासाठी इच्छुकांनी palghar.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान चौथी ४थी उत्तीर्ण असावा. त्याला मराठी भाषा व्यवस्थित लिहिता-वाचता येणे बंधनकारक आहे. २ ऑक्टोबर २०२६ रोजी उमेदवाराचे वय किमान १८ ते कमाल ४० वर्षे असणे आवश्यक आहे. शासकीय नियमांनुसार प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत लागू राहील. महत्त्वाचे म्हणजे, उमेदवार संबंधित गावातील किंवा सजातील स्थानिक रहिवासी असणे अनिवार्य आहे. निवड झालेल्या उमेदवारास दरमहा १६ हजार ५०० रुपये निश्चित मानधन दिले जाईल.
पालघर २१
वाडा १७,
डहाणू १६
जव्हार ११
विक्रमगड १०
तलासरी ०९
मोखाडा ०७