Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागरिकांच्या तक्रारीची दिल्लीपर्यंत दखल; उधवा–संजाण रस्त्याचे काम सुरू होण्याचे संकेत

तलासरी तालुक्यातील एका महत्त्वाच्या मार्गावरील रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे आता प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 16, 2026 | 11:00 AM
नागरिकांच्या तक्रारीची दिल्लीपर्यंत दखल; उधवा–संजाण रस्त्याचे काम सुरू होण्याचे संकेत

नागरिकांच्या तक्रारीची दिल्लीपर्यंत दखल; उधवा–संजाण रस्त्याचे काम सुरू होण्याचे संकेत

Follow Us
Close
Follow Us:
  • अपूर्ण कामामुळे रस्त्यावर खड्डे, दगड आणि उडणाऱ्या धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता.
  • परिसरातील विद्यार्थी, व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या.
  • या समस्येची उच्च पातळीवर दखल घेतल्यानंतर प्रशासनाची हालचाल वाढली असल्याची माहिती समोर आली आहे.
बाजारपेठेतील उधवा-संजाण या महत्त्वाच्या मार्गावरील रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे विद्यार्थी व नागरिक त्रस्त झाले असताना या प्रश्नाची दखल थेट दिल्लीपर्यंत पोहोचली. सामाजिक कार्यकर्ते तबरेज शकील कुरेशी यांनी पालघर जिल्ह्याचे खासदार हेमंत सवरा यांना या समस्येची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून चौकशी केली. संसद अधिवेशन सुरू असतानाही खासदारांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तलासरी नगरपंचायत क्षेत्रातील उधवा-तलासरी-संजाण हा मार्ग तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा मानला जातो. दररोज शाळा आणि महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, बाजारपेठेत येणारे नागरिक तसेच व्यापारी मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात.

Palghar Crime News: डहाणू शहरात गुन्हेगारांचा धुमाकूळ; हातचलाखीने महिलेची १५ हजारांची केली लूट

धुळीमुळे श्वसनाच्या आजारांचा गंभीर प्रश्न

मात्र रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत सोडून दिल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे, दगड-माती आणि धुळीचे ढग निर्माण झाले होते. परिणामी नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. रस्त्याच्या कामामुळे परिसरात सतत उडणाऱ्या धुळीमुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता, लहान मुले, विद्यार्थी, वृद्ध नागरिक तसेच व्यापाऱ्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. बाजारपेठेत येणाऱ्या वाहनांमुळे उडणारी धूळ आणि अपूर्ण कामामुळे तलासरी बाजारपेठ अक्षरशः धुळीच्या ढगात अडकून पडल्याचे चित्र काही दिवसांपासून पाहायला मिळत होते. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तबरेज कुरेशी यांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदन देत रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती.

काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना

त्यानंतर त्यांनी ही बाब खासदार हेमंत सवरा यांच्या निदर्शनास आणून दिली.
संसद अधिवेशनासाठी दिल्लीमध्ये असतानाही खासदारांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत रखडलेल्या कामाबाबत चौकशी केली आणि काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

Fort Trails, Unveiling the Hidden History: समुद्राच्यामध्ये कणखर असा ‘अर्नाळा’! विरारमधील प्रसिद्ध जलदुर्ग, जाणून घ्या इतिहास

काम किती वेगाने करणार ?

  • खासदारांच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनही हलल्याचे दिसून येत असून रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याची माहिती मिळत आहे.
  • दरम्यान, उधवा-संजाण मार्गावरील काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
  • आता प्रशासन आणि ठेकेदार कंपनी हे काम किती वेगाने पूर्ण करतात?, याकडे संपूर्ण तलासरी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Udhwa sanjan road issue talasari citizens complaint dust problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Government
  • Navarashatra
  • palghar

संबंधित बातम्या

सैनिक शाळांमध्ये आता तंत्रज्ञानाचे धडे; अभ्यासक्रमात समाविष्ट होणार AI आणि डेटा सायन्स!
1

सैनिक शाळांमध्ये आता तंत्रज्ञानाचे धडे; अभ्यासक्रमात समाविष्ट होणार AI आणि डेटा सायन्स!

Fort Trails : कुणी दातिवरे किल्ला म्हणतं तर कुणी हिराडोंगर! वैतरणेच्या काठावर वसलेला महत्वाचा गड
2

Fort Trails : कुणी दातिवरे किल्ला म्हणतं तर कुणी हिराडोंगर! वैतरणेच्या काठावर वसलेला महत्वाचा गड

Dharashiv News: जनहिताच्या डीपीसी निधीतून सामाजिक न्यायाला हरताळ : उच्चस्तरीय चौकशीची मागणी
3

Dharashiv News: जनहिताच्या डीपीसी निधीतून सामाजिक न्यायाला हरताळ : उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Fort Trails : आधी ट्रेकिंग कधी केली नाही? मुंबईच्या जवळील ‘असावा’ किल्ल्याला द्या भेट
4

Fort Trails : आधी ट्रेकिंग कधी केली नाही? मुंबईच्या जवळील ‘असावा’ किल्ल्याला द्या भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.