Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar News : डहाणूतील चिमुरडीवर अत्याचार अन् हत्येप्रकरणी ऐतिहासिक निकाल! आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

Palghar News : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्याला हादरवून सोडणाऱ्या आठ वर्षीय चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात पालघर अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 09, 2026 | 11:41 AM
(फोटो सौजन्य: Chatgpt)

(फोटो सौजन्य: Chatgpt)

Follow Us
Follow Us:
  • बलात्काऱ्याला मरेपर्यंत फाशी
  • डहाणूतील अत्याचार अन् हत्येप्रकरण
  • खूनप्रकरणी ऐतिहासिक निकाल
Palghar News : पालघरच्या डहाणू तालुक्यातील रानशेत-वांगडपाडा येथे २०२१ मध्ये आठ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निघृण हत्या केली गेली होती. या प्रकरणी आरोपी प्रमुल ऊर्फ प्रफुल रत्ना घोषे (वय ५० वर्षे) याला पालघर येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत शिक्षा सुनावली आहे. यावेळी न्यायालयाने म्हटलंय की त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी. आरोपीला ७५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

Vasai Tatli Andolan : ‘ताटली’ आंदोलनाला यश! शासनाने घेतली दखल; जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहार पुन्हा सुरू

अतिशय क्रूरपणे घेतला होता बळी

२७ सप्टेंबर २०२१ रोजी रानशेत-वांगडपाडा येथील टाकीजवळील झाडाझुडपांच्या परिसरात आरोपी प्रमुल ऊर्फ प्रफुल घोष याने आठ वर्षीय मुलीवर आरोपीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर कोयत्याने तिच्या डोक्याच्या मागील बाजूस, मानेवर आणि तोंडावर वार करून तिची हत्या केली. मुलीला वाचवण्यासाठी घटनास्थळी गेलेल्या फिर्यादीवरही आरोपीने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने संपूर्ण डहाणू तालुका हादरला होता.

यामुळे गुन्हा झाला सिद्ध

डहाणू पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८९/२०२१ दाखल करण्यात आला होता. पॉक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवून तत्कालीन बोईसर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी नित्यानंद झा यांनी तपास केला. सरकार पक्षाने न्यायालयात २४ साक्षीदार तपासले. उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातन निष्पन्न झालेल्या तथ्यांच्याआधारे आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला.

आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

अपर जिल्हा व सत्र न्यायालय, पालघर-१चे न्यायाधीश ए. आर. रहाणे यांनी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. तसेच ७५ हजार रुपये दंडही ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्ष सहा महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

साक्षीदारांच्या साक्षी ठरल्या महत्वाच्या

या तपास अधिकाऱ्यांनी संकलित केलेले पुरावे आणि सरकार पक्षाने तपासलेल्या २४ साक्षीदारांच्या साक्षी खटल्यात महत्त्वपूर्ण ठरल्या.
तपासी अधिकारी नित्यानंद झा, कोर्ट पैरवी महिला पोलीस उपनिरीक्षक विद्या नरेश बोरे आणि श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय गावड यांनी न्यायालयीन पाहिले.

Palghar Flood Relief : पालघरमधील पूरग्रस्तांना मोठा दिलासा! राज्य सरकारकडून विशेष मदतीची घोषणा; बँक खात्यात जमा होणार पैसे

Web Title: Palghar news court death penalty accused dahanu minor rape murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • Court
  • Court Decision
  • Marathi News
  • palghar
  • palghar crime case
  • Palghar crime news

संबंधित बातम्या

US Russia Bill : अमेरिकेचा भारताला मोठा झटका? रशियाशी व्यापारावर 100 % टॅरिफची टांगती तलवार; काय होणार परिणाम?
1

US Russia Bill : अमेरिकेचा भारताला मोठा झटका? रशियाशी व्यापारावर 100 % टॅरिफची टांगती तलवार; काय होणार परिणाम?

‘Toxic’साठी यशचा मोठा त्याग! नयनताराने सांगितला साडेचार वर्षांचा थक्क करणारा प्रवास
2

‘Toxic’साठी यशचा मोठा त्याग! नयनताराने सांगितला साडेचार वर्षांचा थक्क करणारा प्रवास

निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! शेवटच्या वर्षातील वेतनवाढ नाकारणे चुकीचे; थकबाकी देण्याचे आदेश
3

निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! शेवटच्या वर्षातील वेतनवाढ नाकारणे चुकीचे; थकबाकी देण्याचे आदेश

पुण्यात रुजतेय ‘सायलेंट रीडिंग’ची नवी क्रेझ; ग्रंथालयांच्या चार भिंतींऐवजी उद्याने बनली ‘ओपन एअर लायब्ररी’
4

पुण्यात रुजतेय ‘सायलेंट रीडिंग’ची नवी क्रेझ; ग्रंथालयांच्या चार भिंतींऐवजी उद्याने बनली ‘ओपन एअर लायब्ररी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.