Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Tatli Andolan : ‘ताटली’ आंदोलनाला यश! शासनाने घेतली दखल; जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहार पुन्हा सुरू

Vasai Tatli Andolan : नव्या पुरवठादारांशी करार रखडल्याने राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने'अंतर्गत बंद पडलेला पोषण आहार अखेर पुन्हा सुरू झाला आहे. श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे, पालघर आणि नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या 'ताटली आंदोलनाची' राज्य सरकारने दखल घेतली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 08, 2026 | 11:56 AM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘ताटली’ आंदोलनाचा मोठा दणका
  • शासनाने घेतली दखल
  • विद्यार्थ्यांचा पुन्हा सुरू झाला पोषण आहार
Vasai Tatli Andolan : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा मध्यान्ह पोषण आहार  ( Vasai Tatli Andolan )  प्रशासकीय दिरंगाईमुळे ठप्प झाल्यानंतर उभ्या राहिलेल्या संतापाला अखेर यश मिळाले आहे. नव्या पुरवठादारांशी करार प्रक्रिया रखडल्याने ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने’ अंतर्गत धान्य पुरवठा बंद पडला होता. मात्र, ३१ जुलै रोजी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी रिकाम्या ताटल्या हातात घेऊन केलेल्या ‘ताटली आंदोलनाची’ राज्य शासनाने तातडीने दखल घेत धान्य पुरवठ्याचे आदेश जारी केले असून, राज्यभर पुन्हा पोषण आहाराचे वितरण सुरू झाले आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला नियमित शिजवलेला पोषण आहार मिळणे बंधनकारक आहे.

Vasai Illegal Construction: वसईत बेकायदा बांधकामाला पालिकेचे अभय? तोडक पथक कारवाईशिवाय माघारी; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

हा एकमेव उद्देश

 हे आंदोलन कोणत्याही राजकीय हेतूने नव्हते. विद्यार्थ्यांच्या ताटात पोषण आहार पोहोचावा, हा एकमेव उद्देश होता. शासनाने तातडीने निर्णय घेतल्याने राज्यातील लाखो विद्याथ्यांना दिलासा मिळाला आहे. हा विद्यार्थ्यांच्या हक्काचा विजय आहे, असं श्रमजीवी संघटना, प्रवक्ते चंद्रा जाधव यांनी केलं आहे.

मध्यान्ह भोजन पोहोचण्याचा मार्ग मोकळा

पालघरमध्ये झालेल्या या आंदोलनाची गंभीर दखल घेत शासनाने संबंधित पुरवठादारांना तातडीने करार प्रक्रिया पूर्ण करून सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये धान्य पोहोचवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्यभर युद्धपातळीवर धान्य आणि पोषण आहाराचे वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे लाखो विद्याथ्यांच्या ताटात पुन्हा मध्यान्ह भोजन पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

श्रमजीवी संघटनेने विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे वेधले लक्ष

धान्य पुरवठा बंद पडल्याने आदिवासी, दुर्गम भागासह गरीब विद्यार्थी आहारापासून वंचित राहिले होते. त्यामुळे संतप्त श्रमजीवी संघटनेच्या कार्यकत्यांनी ३१ जुलैला एकाच वेळी राज्यभर ठिकठिकाणी विद्यार्थ्यांसह ताटली मोर्चे काढून राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. या आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष सीता घाटाळ, कार्याध्यक्ष बाळाराम भोईर, सरचिटणीस विजय जाधव, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कासाठी केलेल्या या आंदोलनामुळे शासनाला तातडीने निर्णय घ्यावा लागल्याचा दावा संघटनेने केला आहे.

विरार स्थानक होणार हायटेक! चौपदरीकरण प्रकल्पाला वेग, पुनर्विकास अंतिम टप्प्यात; प्रवाशांना मिळणार ‘या’ सुविधा

Web Title: Vasai tatli andolan success government resumes midday meal zp schools

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • Marathi News
  • Marathi School
  • palghar
  • Palghar news
  • Protest
  • vasai
  • Vasai news

संबंधित बातम्या

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार
1

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा
2

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव
3

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद
4

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.