Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zilla Parishad School: भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी

Zilla Parishad School: विरार पूर्वेतील कोपरी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने येथे शिक्षण घेणाऱ्या ६८ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भिंतींना तडे, छताला गळती आणि इमारतीची चिंताजनक अवस्था असतानाही ठोस उपाययोजना झालेली नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 08, 2026 | 04:38 PM
भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची?

भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची?

Follow Us
Follow Us:
  • कोपरीतील जिल्हा परिषद शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
  • भिंतींना तडे, छताला गळती
  • विरारच्या शाळेत ६८ विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिकतायत?
  • पत्रव्यवहार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष?
निलेश महाडीक, वसई-विरार : वसई-विरार शहरातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींच्या अवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विरार पूर्वेतील कोपरी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेची इमारत चिंताजनक अवस्थेत असून, येथे शिक्षण घेणाऱ्या ६८ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Zilla Parishad School)

२००८ मध्ये सुरू झालेली शाळा

कोपरी गावातील ही जिल्हा परिषद मराठी शाळा २००८ मध्ये सुरू झाली. गेल्या अनेक वर्षांत गावातील विद्यार्थ्यांनी या शाळेतून शिक्षण घेतले. मात्र आता ज्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले जात आहे, त्याच इमारतीच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गोयनका महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन! मैदान गाजवणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा गौरव

भिंतींना तडे, छताला गळती

शाळेच्या वर्गखोल्यांची अवस्था बिकट झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत, तर काही भागांत छताला गळती लागली आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा इमारतीत विद्यार्थ्यांनी नियमित शिक्षण घेणे कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न पालक आणि स्थानिकांसमोर आहे.

६८ विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्याही सुरक्षेचा प्रश्न

सध्या या शाळेत ६८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इमारतीच्या दुरवस्थेमुळे केवळ विद्यार्थ्यांच्याच नव्हे, तर येथे काम करणाऱ्या शिक्षकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, शाळेच्या इमारतीच्या परिस्थितीबाबत संबंधित प्रशासनाला अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र अद्याप अपेक्षित ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा त्यांचा दावा आहे.

१९२ शाळांपैकी ११२ शाळांच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव

वसई-विरार परिसराचे शहरीकरण झाल्यानंतर स्थानिक प्रशासकीय रचनेतही मोठे बदल झाले. ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि त्यानंतर वसई-विरार महानगरपालिकेची स्थापना झाली. त्यानंतर वसई तालुक्यातील १९२ जिल्हा परिषद शाळांपैकी ११२ शाळा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव पुढे आला.

मात्र अनेक वर्षांनंतरही शाळांच्या हस्तांतरणाचा मुद्दा पूर्णपणे मार्गी लागलेला नसल्याने इमारतींची देखभाल, दुरुस्ती आणि प्रशासकीय जबाबदारीचा प्रश्न कायम असल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषद की महापालिका?

या प्रकरणामुळे प्रशासनाच्या जबाबदारीबाबत महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. शाळेची इमारत असुरक्षित असल्यास तिची तातडीने संरचनात्मक तपासणी कोण करणार? आवश्यक दुरुस्तीसाठी निधी कोण देणार? आणि दुरुस्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांसाठी पर्यायी सुरक्षित वर्गखोल्यांची व्यवस्था केली जाणार का? याकडे आता पालकांचे लक्ष लागले आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची गरज

शिक्षणाच्या गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोपरीतील शाळेच्या इमारतीची तातडीने तांत्रिक तपासणी करून ती धोकादायक असल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे आणि आवश्यक दुरुस्ती करणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरू शकते. ६८ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार आणि ११२ शाळांच्या हस्तांतरणाचा प्रश्न अखेर कधी निकाली निघणार, याकडे आता वसई-विरारकरांचे लक्ष लागले आहे.

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Web Title: Vasai virar kopri zilla parishad marathi school building in danger 68 students safety at risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • maharashtra
  • School
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Purandar Airport : विमानतळ भूसंपादनात ‘रात्रीच्या व्यवहारां’ची चर्चा; शासकीय विश्रामगृहातील कथित मोबदला वाटपावर आरोप
1

Purandar Airport : विमानतळ भूसंपादनात ‘रात्रीच्या व्यवहारां’ची चर्चा; शासकीय विश्रामगृहातील कथित मोबदला वाटपावर आरोप

Housing Problems: उपोषणे झाली, आश्वासनेही मिळाली; तरी टाटा कंपनीकडून ना जमीन, ना घरे! तापकीरवाडीतील आदिवासींच्या समस्या कायम
2

Housing Problems: उपोषणे झाली, आश्वासनेही मिळाली; तरी टाटा कंपनीकडून ना जमीन, ना घरे! तापकीरवाडीतील आदिवासींच्या समस्या कायम

आंबेगाव तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; ‘हंडा मोर्चा’ काढून प्रशासनाला धरले धारेवर
3

आंबेगाव तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; ‘हंडा मोर्चा’ काढून प्रशासनाला धरले धारेवर

FDA News: महाराष्ट्रात औषध विक्रेत्यांवर FDA चा मोठा बडगा! दोन आठवड्यांत २९ परवाने रद्द, ७१ निलंबित
4

FDA News: महाराष्ट्रात औषध विक्रेत्यांवर FDA चा मोठा बडगा! दोन आठवड्यांत २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.