Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar Water Tax Hike : अपुरा पाणीपुरवठा अन् वाढीव पाणीपट्टी! महासभेत सत्ताधारी-विरोधक भिडले; भाजप आक्रमक

Vasai Virar Water Tax Hike : वसई-विरार शहरात अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर झाली असताना, महापालिकेने केलेली पाणीपट्टी करवाढ मागे घेण्याच्या मागणीवरून महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 02, 2026 | 12:48 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सत्ताधारी-विरोधकांत जोरदार खडाजंगी
  • महासभेत भाजप आक्रमक
  • अपुऱ्या पाणीपुरवठा तरीही वाढीव पाणीपट्टी
Vasai Virar Water Tax Hike : शहरातील अनेक भागांत पुरेसा पाणीपुरवठा होत नसताना महापालिकेने केलेली पाणीपट्टी करवाढ अन्यायकारक असल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी महासभेत तीव्र विरोध केला. एकीकडे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे, तर दुसरीकडे वाढीव पाणीपट्टीचा आर्थिक भार सोसायट्या आणि नागरिकांवर टाकला जात असल्याने आधी नियमित पाणी द्या, त्यानंतरच करवाढीचा विचार करा, अशी आक्रमक भूमिका भाजपने घेतली. सोमवारी झालेल्या वसई-विरार महापालिकेच्या महासभेत पाणीप्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दावा केला जात प्रत्यक्षात अनेक भागांत अनियमित आणि अपुरा पुरवठा होत असल्याचे नगरसेवकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. भाजप नगरसेवक हितेश जाधव यांनी नालासोपारा, कारगिल नगर परिसरातील अनेक सोसायट्या, झोपडपट्टी भागात नियमित पाणी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. ( Vasai Virar Water Tax Hike ) 

Vasai Road : ‘नागरिकांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही!’, आ. स्नेहा दुबेंच्या इशाऱ्यानंतर महापालिकेची धडक कारवाई

वेळपत्रक कोलमडले

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्यातच ठिकाणी कमी पाणी सोडले जात असल्याच्या तक्रारीही सदस्यांनी केल्या. पाणी वितरणासाठी स्वतंत्र आणि शास्त्रशुद्ध आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आली. धुकटन आणि मासवन परिसरातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. या भागातील वीज खंडित होण्याची समस्या गेल्या सात-आठ वर्षापासून कायम असल्याचे नगरसेवक पंकज देशमुख यांनी सांगितले, त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.

मार्च २०२७ पर्यंतचे उद्दिष्ट

दरम्यान, पाणीपुरवठ्यातील वीज ‘ट्रिपिंग ‘ची समस्या कमी करण्यासाठी महापालिकेने महावितरणला १ कोटी ३८ लाख रुपये माहिती विडीतील एक कलमीटरपेक्षा अधिक जलवाहिन्यांचे कोटिंग केल्याने ट्रिपिंगची समस्या सुमारे ८० टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा करण्यात आला. ‘अमृत’ योजनेंतर्गत ४०० किलोमीटरपेक्षा अधिक जलवाहिन्या आणि नदीन पाण्याच्या टाक्यांची कामे सुरू असून, आतापर्यंत ६७ टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२७ पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रशासनाने सांगितले.

व्यावसायिक, औद्योगिक जोडण्यांना मंजुरी नको

विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी अपुरा पाणीपुरवठा आणि वाढीव पाणीपट्टीमुळे असल्याचे सांगितले. महापालिकेचे पाणी पुरेसे मिळत नसल्याने नागरिकाना टैंकर मागवावा लागती आणि त्याचवेळी वाढीव पाणीपट्टीही भरावी लागते, याकडे त्यानी लक्ष वेधले. सामान्य नागरिक आणि सोसायट्यांना पुरेसा पाणीपुरवठा होईपर्यंत व्यावसायिक व औद्योगिक पाणी जोडण्यांना मंजुरी देऊ नये, अशी मागणीही करण्यात आली.

हप्त्याची सुविधा उपलब्ध

महापौर अजीव पाटील यांनी नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून घरपट्टी किंवा असेसमेंटच्या तांत्रिक कारणांमुळे कोणाचेही पाणी बंद केले जाणार नसल्याची ग्वाही महापौर अजीव पाटील यांनी दिली. वाढीव पाणीपट्टी भरण्यास अडचण असलेल्या सोसायट्वा व नागरिकांना हप्त्याची सुविधा देण्याची सूचना उपमहापौर मार्शल लोपिसे यांनी केली. मात्र पाणीपट्टी करवाढ मागे घेण्याच्या मागणीवर भाजप नगरसेवक ठाम राहिल्याने महासभेत पाणीप्रश्न चांगलाच तापला.

Vasai Virar News : महापालिकेचा मोठा निर्णय? निराधार महिलांच्या अनुदानात होणार वाढ; दरमहा मिळणार ‘इतके’ रुपये

Web Title: Vasai virar water tax hike municipal corporation general body meeting clash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • Drinking Water
  • tax
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Vasai Virar Roads : दरवर्षी कोट्यवधींचे ‘पॅचवर्क’, मग काँक्रिटचे रस्ते कधी? वसई-विरारकरांचा पालिकेला संतप्त
1

Vasai Virar Roads : दरवर्षी कोट्यवधींचे ‘पॅचवर्क’, मग काँक्रिटचे रस्ते कधी? वसई-विरारकरांचा पालिकेला संतप्त

Vasai Virar News : महापालिकेचा मोठा निर्णय? निराधार महिलांच्या अनुदानात होणार वाढ; दरमहा मिळणार ‘इतके’ रुपये
2

Vasai Virar News : महापालिकेचा मोठा निर्णय? निराधार महिलांच्या अनुदानात होणार वाढ; दरमहा मिळणार ‘इतके’ रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.