Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुंढे साखर आयुक्त झाल्यास कारखानदार सरळ होतील’, तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ पंढरपुरात दूध अभिषेक; शेतकऱ्यांचा मोठा दावा

एफडीआय आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामगिरीवर खूश होऊन पंढरपुरात शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. तसेच साखर कारखानदारांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी मुंढे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्याची मागणी केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 04, 2026 | 03:24 PM
‘मुंढे साखर आयुक्त झाल्यास कारखानदार सरळ होतील’, तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ पंढरपुरात दूध अभिषेक; शेतकऱ्यांचा मोठा दावा
Follow Us
Follow Us:
  • तुकाराम मुंढेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • ‘साखर आयुक्त करा, शेतकऱ्यांना न्याय द्या’ची हाक”
  • “मुंढे साखर आयुक्त झाल्यास कारखानदार सरळ होतील; शेतकऱ्यांचा विश्वास
शिवाजी हळणवर/पंढरपूर: भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात राज्यभर सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे चर्चेत असलेले अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना साखर आयुक्तपदी नियुक्त करावे, अशी जोरदार मागणी माढा तालुक्यातील शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. या मागणीसाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून अनोखे आंदोलन करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते शंभूराजे साठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंढे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत दुग्धाभिषेक केला. प्रशासनातील प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जनहिताची भूमिका यांचे प्रतीक म्हणून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.

भेसळखोरांविरोधात कोणतीही तडजोड न करता सुरू असलेल्या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मुंढे यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला असून, त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

आंदोलकांनी यावेळी साखर उद्योगातील प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी कायद्याचे उल्लंघन करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे देयक थकविल्याचा आरोप करण्यात आला. अनेक कारखान्यांकडे ऊसबिले तसेच कामगारांच्या पगाराची थकबाकी असल्याचेही आंदोलकांनी सांगितले.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांच्या निशाण्यावर आता सेलिब्रिटी! भ्रामक जाहिरातींवर होणार कडक कारवाई

विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखानदारांनी नवीन गाळप हंगामाची तयारी सुरू केली असली तरी मागील हंगामातील ऊस उत्पादकांची देणी अद्याप दिलेली नाहीत. सध्याचे साखर आयुक्त केवळ कागदोपत्री कारवाई करत असल्याचा आरोप करत, तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची साखर आयुक्तपदी नियुक्ती झाल्यास थकीत रकमेच्या वसुलीला गती मिळेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केला.

शासनाने शेतकरी हिताचा विचार करून तुकाराम मुंढे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करावी. उपस्थिती आबा साठे, पिंटू काशीद सचिन करळे, बालाजी खेडकर ,संदीप साठे, गौतम शिंदे ,सचिन वाघ, सुधीर वाळगड ,सतीश जमदाडे ,काका पाटील सह शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उपस्थिती

दूधाला न्याय देणाऱ्या अधिकाऱ्याला दूधाचा अभिषेक!

एफडीआयचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त दूधाविरोधात कठोर कारवाईचे पाऊल उचलणारे तुकाराम मुंढे यांच्याविषयी शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. भेसळ रोखल्यामुळे शुद्ध दुधाला योग्य बाजारभाव मिळण्याची आशा बळावली असून, त्यातून शेतकऱ्यांच्या दुधाच्या दरात वाढ होण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या वतीने तुकाराम मुंढे यांचा दूग्धाभिषेक करून सन्मान करण्यात आला. यावेळी एफडीआय आयुक्त म्हणून त्यांचा किमान तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यात यावा, जेणेकरून विभागातील कारभार अधिक स्वच्छ, पारदर्शक आणि जनहिताभिमुख होईल.

तसेच, पुढील काळात त्यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात यावी, अशीही जोरदार मागणी करण्यात आली. मुंढे यांच्या कार्यपद्धतीमुळे साखर उद्योगातील गैरप्रकारांवर नियंत्रण राहील, कारखानदारांवर वचक निर्माण होईल, शेतकऱ्यांना उसाची बिले १५ दिवसांच्या आत मिळतील आणि सहकारी संस्था तसेच साखर कारखान्यांमध्ये पारदर्शक प्रशासनाची नवी संस्कृती रुजेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. “भेसळीवर प्रहार, शेतकऱ्यांचा आधार; म्हणूनच मुंढे साहेबांना दूधाचा अभिषेक आणि तीन वर्षांच्या कार्यकाळासह साखर आयुक्तपदाची मागणी”, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

भिवंडीत ‘मिथेनॉल’चा मोठा साठा जप्त; आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार एफडीएची धडक कारवाई

Web Title: Pandharpur farmers performs dugdhabhishek demands tukaram mundhe as sugar commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Farmers
  • pandharpur
  • Solapur
  • Sugar
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे
1

जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी
2

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी

१० हजार चौ.फुटांच्या जागेवर ‘डोळा’? सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली जागा हडपण्याचा आरोप; विरोधकांच्या आक्षेपानंतर प्रस्ताव तहकूब
3

१० हजार चौ.फुटांच्या जागेवर ‘डोळा’? सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली जागा हडपण्याचा आरोप; विरोधकांच्या आक्षेपानंतर प्रस्ताव तहकूब

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २१ वर्षांत ७८१ शेतकरी आत्महत्या! फक्त २ शेतकरी कुटुंबांनाच मदत; तब्बल ४७६ प्रकरणे ठरवली अपात्र
4

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २१ वर्षांत ७८१ शेतकरी आत्महत्या! फक्त २ शेतकरी कुटुंबांनाच मदत; तब्बल ४७६ प्रकरणे ठरवली अपात्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.