Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Prabhat Lodha: “… महोत्सवात ‘आदर्श गाव’ संकल्पना राबवा”; मंत्री लोढांचे प्रशासनाला निर्देश

पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचे कार्य,विचार प्रणाली,एकात्म मानव दर्शन इ. बाबतची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पंडितजींच्या विचारांवर आधारित एक लाख पुस्तिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 16, 2025 | 04:11 PM
Mangal Prabhat Lodha: “… महोत्सवात ‘आदर्श गाव’ संकल्पना राबवा”; मंत्री लोढांचे प्रशासनाला निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचला पाहिजे, खऱ्या अर्थाने अंत्योदयांच्या माध्यमानेच लोकशाहीच्या उदिष्ठाची पूर्ती होईल, हा मौलिक विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला. त्यांच्या विचारांवर आधारित पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव राज्यभरात राबवण्यात येणार आहे. ‘आदर्श गाव’ ही संकल्पना या महोत्सवात राबवण्यात येणार आहे शासनाचे सर्व विभाग तसेच जिल्हास्तरावर हा कार्यक्रम यशस्वीपणे करा असे कौशल्य विकास,उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निर्देश दिले.

राज्यात दि.२२ ते २५ एप्रिल दरम्यान पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव राबवण्यात येणार आहे याबाबत मंत्रालयात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती .या बैठकीत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते.यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक,कौशल्य विकास विभागाच्या अपर सचिव मनीषा वर्मा, दिव्यांग कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, महिला बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव,आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, दीनदयाळ संशोधन संस्थेचे सचिव अतुल जैन यावेळी उपस्थित होते.

दूरदृश्यप्रणालीव्दारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी या बैठकीत सहभागी झाले. येत्या २२ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान पंडित दीनदयाळ उपाध्याय मानव एकात्म हीरक महोत्सव राबवण्यात येणार आहे.शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन महोत्सव समिती स्थापन केली असून या समितीचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा अध्यक्ष आहेत.मानव कल्याण यासंदर्भातील त्यांचे मौलिक विचार समाजात रुजावेत या उद्देशाने देशभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय मानव एकात्म हीरक महोत्सव साजरा होणार आहे. देशभरात या महोत्सवाला सुरुवात करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी या बैठकीत दिली.

पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचे कार्य,विचार प्रणाली,एकात्म मानव दर्शन इ. बाबतची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पंडितजींच्या विचारांवर आधारित एक लाख पुस्तिकांचे वितरण करण्यात येणार आहे. या महोत्सवात ग्रामीण भागात बचत गट, अंगणवाड्या आणि शाळांमध्ये कौशल्य विकासा वर भर देण्यात येणार आहे. तसेच गावातील स्वच्छता विषयक उपक्रम,घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत योजना तयार करण्याच्या सूचना ही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

https://twitter.com/MPLodha/status/1912443407030481165

 

समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासकीय योजना पोहचवण्यासाठी या महोत्सवात युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.या महोत्सवात महिला बाल विकास, शिक्षणविभाग, ग्रामविकास, सांस्कृतिक विभाग, आदिवासी विभाग, पर्यावरण,पर्यटन या विभागाकडून ही महोत्सवात विविध कार्यक्रमाद्वारे योगदान दिले जाणार आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे जिल्हास्तरावर समिती स्थापन करून हा महोत्सव जिल्हाधिकारी यांनी यशस्वी करावा अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.

Web Title: Pandit deendayal upadhyay implement the ideal village concept at ekat manav darshan diamond festival mangal prabhat lodha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Mangalprabhat Lodha
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी
1

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai News : पश्चिम मुंबईसाठी २००० मीटर लांबीचा विशेष आराखडा, कसा असेल प्रकल्प? जाणून घ्या…
2

Mumbai News : पश्चिम मुंबईसाठी २००० मीटर लांबीचा विशेष आराखडा, कसा असेल प्रकल्प? जाणून घ्या…

भांडुपमध्ये भीषण अपघात; भरधाव ‘बेस्ट’ने अनेकांना चिरडले, चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी
3

भांडुपमध्ये भीषण अपघात; भरधाव ‘बेस्ट’ने अनेकांना चिरडले, चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी

Mumbai Redevelopment 2026: आता मुंबई वाढणार नाही, तर सुधारणार! २०२६ मध्ये पुनर्विकास ठरणार शहराच्या प्रगतीचे इंजिन
4

Mumbai Redevelopment 2026: आता मुंबई वाढणार नाही, तर सुधारणार! २०२६ मध्ये पुनर्विकास ठरणार शहराच्या प्रगतीचे इंजिन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.