Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: परवानगीपूर्वीच केली मूर्तिकामाला सुरुवात! परळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला रेल्वे प्रशासनाची तंबी

संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार सुरु झाली आहे. पण परळ येथील सेंट्रल रेल्वे कॉलनीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने रेल्वेची अधिकृत परवानगी मिळण्याआधी गणेशमूर्ती तयार करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे कॉलनीतील रहिवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर मध्य रेल्वेने याबद्दल चौकशी करण्यास सुरुवात केली.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 15, 2026 | 01:00 PM
परवानगीपूर्वीच केली मूर्तिकामाला सुरुवात! परळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला रेल्वे प्रशासनाची तंबी

परवानगीपूर्वीच केली मूर्तिकामाला सुरुवात! परळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला रेल्वे प्रशासनाची तंबी

Follow Us
Follow Us:

परळ येथील सेंट्रल रेल्वे कॉलनीतील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने रेल्वेची अधिकृत परवानगी मिळण्यापूर्वीच गणेशमूर्ती साकारण्यास सुरुवात केल्याचा प्रकार समोर आला आहे. रेल्वे कॉलनीतील रहिवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर मध्य रेल्वेने चौकशी केली असता, रेल्वेच्या जागेवर परवानगीशिवाय मूर्ती तयार करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित मंडळाने १३ जून रोजी गणेशोत्सवासाठी मंडप उभारणे, गणेशमूर्ती साकारणे आणि स्थापना करण्यासाठी मध्य रेल्वेकडे परवानगी मागितली होती. मात्र, परवानगी मिळण्यापूर्वीच मूर्ती साकारण्याचे काम सुरू झाल्याने नियमपालनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Mumbai Metro 5: ठाणे-भिवंडी-कल्याण मार्गिकेला मिळणार चालना! मेट्रो मार्ग 5 ला वेग, 27 हेक्टरमध्ये उभा राहतोय अत्याधुनिक कशेळी डेपो

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या तयार होत असलेल्या गणेशमूर्तीला कोणताही धोका निर्माण होऊ नये, पडझड होऊ नये तसेच गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, याचा विचार करून यंदा सुरू असलेले काम थांबविण्यात आले नाही. मात्र, संबंधित मंडळ आणि मूर्तिकाराला तंबी देण्यात आली आहे. असून, पुढील वर्षी पूर्वपरवानगीशिवाय असे कोणतेही काम करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

कामांबाबत रेल्वे बोर्डाचा नियम काय सांगतो?

रेल्वे बोर्डाच्या नियमांनुसार आणि मध्य रेल्वेच्या निर्देशांप्रमाणे, रेल्वेच्या जमिनीच्या सीमेपासून ३० मीटरच्या आत कोणतेही बांधकाम, मंडप, शेड किंवा अन्य संरचना उभारण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. परवानगीशिवाय उभारलेले बांधकाम अनधिकृत मानले जाते. अशा बांधकामांवर नियमानुसार कारवाई होऊ शकते. रेल्वे प्रकल्पांमध्ये अडथळे टाळण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

कशेडी घाटात दरड कोसळली! महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम; मुंबईच्या दिशेने जाणारी एक लेन पूर्णतः बंद

रेल्वेच्या मालकीच्या जागेवर कोणतेही बांधकाम, मंडप उभारणी किंवा धार्मिक उपक्रम सुरू करण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगीशिवाय असे काम करणे नियमबाह्य असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. रहिवाश्यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यंदा तयार होत असलेल्या गणेशमूर्तीचे नुकसान होऊ नये आणि गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, म्हणून सुरू असलेले काम थांबविण्यात आले नाही. मात्र, संबंधित मूर्तिकाराला असा प्रकार पुन्हा करू नये अशी सूचना देण्यात आली आहे. रेल्वेच्या जागेवर कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी रेल्वेची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य असून, पुढील वर्षी नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

 

Web Title: Parel public ganesh mandal receives railway warning for starting idol work before permission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Ganpati Festival
  • Local Trains
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Milind Deora News: 2029 मध्ये वरळीचा आमदार बदलायचा; मिलिंद देवरांचा रोख कुणाकडे?
1

Milind Deora News: 2029 मध्ये वरळीचा आमदार बदलायचा; मिलिंद देवरांचा रोख कुणाकडे?

Mumbai News: ‘सीएसएमटी ‘च्या घुमटाला गळती! जुन्या दगडांचा सच्छिद्रपणा कारणीभूत; आरएलडीएने दिले स्पष्टीकरण
2

Mumbai News: ‘सीएसएमटी ‘च्या घुमटाला गळती! जुन्या दगडांचा सच्छिद्रपणा कारणीभूत; आरएलडीएने दिले स्पष्टीकरण

डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना दिलासा; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
3

डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना दिलासा; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Indian Railways Big Decision : तुमचं घर रेल्वे ट्रॅकजवळ आहे का? मग ‘हे’ नियम नक्की वाचा!
4

Indian Railways Big Decision : तुमचं घर रेल्वे ट्रॅकजवळ आहे का? मग ‘हे’ नियम नक्की वाचा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.