Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Patan water crisis: पाटणमध्ये पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती, विहिरींनी गाठला तळ गाठला; ७ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू

Patan water crisis : पाटण तालुक्यातील अनेक गावे व वाड्यावस्त्यांमध्ये पाणीटंचाई असून सामाजिक जबाबदारीच्या भावनेने गावातील नोकरदार, व्यावसायिक, पुणे, मुंबई येथे राहणारे उद्योजक गावासाठी स्वखर्चातून पाणी टँकर पुरवत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: May 27, 2026 | 01:38 PM
Patan water crisis, Satara district tanker water supply

Patan water crisis, Satara district tanker water supply

Follow Us
Follow Us:
  • पाटणमध्ये पाणीपुरवठा विभागामार्फत ७ गावांना टँकरने पाणीपुरवठा
  • पाण्यासाठी पाटणमधील डोंगरी भागातील नागरिकांची दाहीदिशा फिरती
  • टंचाईग्रस्त गावांमध्ये तत्काळ टँकर सुरू करण्याची ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी
Patan water crisis: पाटण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागामार्फत तालुक्यातील ७ गावांना सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. याशिवाय इतर काही गावांना पाणी टंचाईची झळ बसत आहे. संबंधित गावातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, पदाधिकारी यांच्याकडून वाड्यावस्त्यांवर स्वखर्चातून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मॉन्सून वेळेत दाखल झाला नाही तर पाणी टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी, अशी ग्रमस्थांची मागणी आहे.

पाटण तालुक्यातील फडतरवाडी, घोट, शिद्रूकवाडी, खळे, वरची शिद्रूकवाडी, डेरवण, जंगलवाडी आदी ७ गावांमध्ये शासनाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत टँकरने पाणी पुरवले जात आहे. मोरणा विभागातील काही गावांचे ग्रॅव्हिटी पाणीपुरवठ्याचे स्त्रोत आटल्याने कोकीसरे, पांढरेपाणी, धावडे, किल्ले मोरगिरीसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या वाढत आहे.

World No Tobacco Day : तंबाखूमुक्त दिनाआधी मंत्रालयात मोठी आरोग्य मोहीम; 200 हून अधिक कर्मचाऱ्यांची तपासणी

तालुक्यात ४०० पेक्षा जास्त गावे व वाड्यावस्त्या आहेत. कोयना नदीकाठावरील गावांना पाण्याची समस्या नाही. मात्र दुर्गम व डोंगरी भागात राहणारी गावे, वाड्यावस्त्यांमधील नागरिक पाण्यासाठी दाहीदिशा फिरताना दिसत आहेत. डोंगरमाळावर पाण्याचे स्त्रोत शोधत त्यांना फिरावे लागत आहे.

पाणी असणाऱ्या विहिरींनीदेखील तळ गाठले आहेत. पाळीव जनावरे, कपडे धुलाई, घरातील भांडी स्वच्छता, आंघोळ आणि पिण्याचे पाणी यासाठी लोकांना पाणी मिळवण्यासाठी मैलोनमैल जावे लागत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. काही ठिकाणी टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

ज्या-ज्या गावात पाणी टंचाईबाबत प्रस्ताव येतील त्या, त्या गावात प्रशासनाने तत्काळ टँकरने पाणीपुरवठा करावा. संबंधित विभागाने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता टंचाईग्रस्त गावांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण अपेक्षित असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्य जात आहेत.

‘भारताला जागतिक महाशक्ती बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले’; मुख्यमंत्र्यांचं गौरोद्गार

दानशूर व्यक्तींकडून पाण्याच्या टँकरचे वाटप

पाटण तालुक्यातील अनेक गावे व वाड्यावस्त्यांमध्ये पाणीटंचाई असून सामाजिक जबाबदारीच्या भावनेने गावातील नोकरदार, व्यावसायिक, पुणे, मुंबई येथे राहणारे उद्योजक गावासाठी स्वखर्चातून पाणी टँकर पुरवत आहेत. ढेबेवाडी भागातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीला निवडून आलेले पदाधिकारी व माजी पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते टँकरने पाणीपुरवठा करत आहेत.

यासंदर्भात बोलताना ग्रामीण पाणी पुरवठा, पाटण उपविभागाचे उपअभियंता प्रतीक भाट म्हणाले की, “पाटण तालुक्यातील काही ग्रॅव्हिटी योजनांचे स्त्रोत, पाण्याचे स्त्रोत आटत आल्याने गावांना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही तेथे पर्यायी व्यवस्था करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ज्या गावात अजिबात पाण्याची व्यवस्था अथवा पाणी मिळण्याचे साधन नाही तेथे टँकरने पाणी पुरवले जात आहे.”

 

 

Web Title: Patan water crisis satara district tanker water supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • Satara News
  • Water Crisis
  • Water Tanker

संबंधित बातम्या

Water Crisis : बार्डी गावात पाणीटंचाईचा उद्रेक; महिलांचा पंचायत समितीवर मोर्चा,ग्रामस्थांचा संताप
1

Water Crisis : बार्डी गावात पाणीटंचाईचा उद्रेक; महिलांचा पंचायत समितीवर मोर्चा,ग्रामस्थांचा संताप

Satara Crime: पोलीस दलाला मोठा धक्का! साताऱ्यातील कॉन्स्टेबलने उचललं टोकाचं पाऊल
2

Satara Crime: पोलीस दलाला मोठा धक्का! साताऱ्यातील कॉन्स्टेबलने उचललं टोकाचं पाऊल

देवस्थान इनामाच्या 111.6 गुंठ्यांच्या जमिनीबाबत गैरव्यवहाराचा आरोप; हेमंत मोरेंनी केली महत्त्वाची मागणी
3

देवस्थान इनामाच्या 111.6 गुंठ्यांच्या जमिनीबाबत गैरव्यवहाराचा आरोप; हेमंत मोरेंनी केली महत्त्वाची मागणी

Navi Mumbai News: मोरबे धरणातील पाणीसाठा ७३.९० टक्क्यांवर; नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
4

Navi Mumbai News: मोरबे धरणातील पाणीसाठा ७३.९० टक्क्यांवर; नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.