PCMC Mayoral Election 2026: पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड
पिंपरी चिंचवडच्या महापौर पदी भाजपचे रवी लांडगे यांची निवड निश्चित झाली असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. सलग दोन वेळा बिनविरोध नगरसेवक निवडून आलेल्या लांडगे आले आहेत. मात्र, या निवडीमुळे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची संधी हुकल्याची चर्चा आहे.
Kolhapur Mayoral Election 2026: कोल्हापूर महानगरपालिकेवर महापौरपदी रूपाराणी निकम यांची निवड
विधानसभेच्या वेळी काटे यांनी आमदार शंकर जगताप यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेचा वचपा काढत, जगतापांनीच लांडगे यांच्या नावाला पाठबळ दिल्याचे बोलले जात आहे. मध्ये काही काळ ठाकरे सेनेत जाऊन पुन्हा भाजपमध्ये परतलेल्या लांडगे यांच्या गळ्यात अखेर महापौर पदाची माळ पडली आहे.
२०१७ मध्येही लांडगे यांनीच भाजपचे पहिले खाते उघडले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार निलेश सूर्यवंशी यांचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद झाला, तर अपक्ष उमेदवार प्रसाद ताठे यांनी लांडगे यांच्या मनधरणीनंतर आपला अर्ज मागे घेतला. रवी लांडगे यांच्या पत्नी श्रद्धा लांडगे यांनीही आपला अर्ज मागे घेतल्याने रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले असून, आता केवळ त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
BMC Election 2026: BMCमध्ये भाजप गटनेतेपदी गणेश खणकर यांची वर्णी
रवी लांडगे हे शहरातील एक अभ्यासू आणि जनसंपर्क असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी विविध समित्यांवर काम केले असून, प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या निवडीमुळे सत्ताधारी पक्षात उत्साहाचे वातावरण असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रवी लांडगे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले. यावेळी शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करणे, वाढत्या वाहतूक कोंडीवर शाश्वत उपाययोजना राबवणे, पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पांना गती देणे. महापालिकेचे कामकाज अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करणे” या मुद्द्यांवर भर दिला.






