• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pimpri Chinchwad Carporation Alert Mode About Hmpv Virus Latest Update

‘HMPV’च्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका दक्ष; ‘या’ रूग्णांचे सर्वेक्षण होणार

चीनमध्ये HMPV च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याच्या बातम्या मिळाल्यानंतर केंद्र सरकार, आयसीएमआर (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद), आणि एनसीडीसी (राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र) यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 09, 2025 | 09:26 PM
‘HMPV’च्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका दक्ष; ‘या’ रूग्णांचे सर्वेक्षण होणार

HMPV व्हायरसबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपलिका सतर्क (फोटो- टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पिंपरी:  ह्युमन मेटान्यूमो (एचएमपीव्ही) या विषाणूचा भारतात शिरकाव झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या आठही रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातील सर्दी, खोकल्याच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे.

 पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आराेग्य वैद्यकीय विभागाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एचएमपीव्ही विषाणूबाबत खबरदारीची पावले उचलली आहेत. एचएमपीव्ही विषाणूच्या अहवालाबाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून, भीतीचे वातावरण निर्माण करू नये. तसेच सर्दी, खाेकला, ताप ही लक्षणे आढळल्यास नजीकच्या महापालिका दवाखाना किंवा रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

 खोकला किंवा शिंका येत असताना तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे. साबण, सॅनिटायझरने हात वारंवार धुवावेत. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावे. भरपूर पाणी प्यावे. पौष्टिक खावे, संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी. दररोज स्वच्छ रुमाल वापरावा. हस्तांदोलन, टिश्यू पेपरचा पुनर्वापर, आजारी लोकांशी जवळचा संपर्क, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे, सार्वजनिक ठिकाणी धुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे टाळण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.

 आठ रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यकता पडल्यास खाटांची संख्या वाढविण्यात येईल. गरज लागल्यास एक रुग्णालय एचएमपीव्हीसाठी राखीव ठेवण्यात येईल. सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची नोंद ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेचे आराेग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

 पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिकनगरी असल्यामुळे विविध ठिकाणाहून नागरिक सातत्याने कामानिमित्ताने ये-जा करतात. त्यामुळे शहरात कटाक्षाने खबरदारी घ्यावी. प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात HMPV विषाणूचा शिरकाव

भारतात HMPV म्हणजेच ह्यूमन मेटान्यूमोव्हायरसच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. नागपूरमध्ये या विषाणूच्या संसर्गाचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. देशभरात आतापर्यंत सात जणांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मात्र, केंद्र सरकारने सांगितले आहे की या प्रकरणांमध्ये वाढ झाली तरी कोविडसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. बेंगळुरू, नागपूर, आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन, तर अहमदाबादमध्ये एक रुग्ण नोंदवला गेला आहे.

हेही वाचा: HMPV Virus in Maharashtra: महाराष्ट्रात HMPV विषाणूचा शिरकाव; नागपुरात दोन रूग्णांची नोंद

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे स्पष्टीकरण

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सोमवारी व्हिडिओद्वारे माहिती दिली की, HMPV हा नवीन विषाणू नाही. 2001 साली या विषाणूची प्रथम ओळख झाली आणि त्यानंतर तो संपूर्ण जगभर पसरला आहे. हा विषाणू श्वसनमार्गातून हवेच्या माध्यमातून पसरतो आणि सर्व वयोगटांतील लोकांना प्रभावित करू शकतो. विशेषतः हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव अधिक दिसतो.

चीनमध्ये HMPV च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याच्या बातम्या मिळाल्यानंतर केंद्र सरकार, आयसीएमआर (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद), आणि एनसीडीसी (राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र) यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) लवकरच यावर आपला अहवाल सादर करेल. नड्डा यांनी स्पष्ट केले की, भारतात सामान्य श्वसन विषाणूंच्या प्रकरणांमध्ये विशेष वाढ झालेली नाही.

Web Title: Pimpri chinchwad carporation alert mode about hmpv virus latest update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 09:25 PM

Topics:  

  • Maharashtra Health Department

संबंधित बातम्या

अद्याप प्रतीक्षाच ! पंढरपुरात साडेचार कोटींचे प्राथमिक आरोग्य केंद्र धूळखात; डॉक्टर-कर्मचारी पदांची मंजुरी अडकली लालफितीत
1

अद्याप प्रतीक्षाच ! पंढरपुरात साडेचार कोटींचे प्राथमिक आरोग्य केंद्र धूळखात; डॉक्टर-कर्मचारी पदांची मंजुरी अडकली लालफितीत

गडचिरोलीत एक-दोन नव्हेतर ‘इतके’ आढळले बोगस डॉक्टर; नागरिकांच्या जीवाशी खेळच
2

गडचिरोलीत एक-दोन नव्हेतर ‘इतके’ आढळले बोगस डॉक्टर; नागरिकांच्या जीवाशी खेळच

आरोग्य विभागाच्या सेवा लवकरच होणार ऑनलाईन; मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वपूर्ण आदेश
3

आरोग्य विभागाच्या सेवा लवकरच होणार ऑनलाईन; मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वपूर्ण आदेश

Pune News: दीनानाथ मंगेशकर रूग्णालयावर कारवाई कधी होणार? आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
4

Pune News: दीनानाथ मंगेशकर रूग्णालयावर कारवाई कधी होणार? आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य

कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार; भोगावती नदीला महापूर, लक्ष्मी जलाशय शंभर टक्के भरला

कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार; भोगावती नदीला महापूर, लक्ष्मी जलाशय शंभर टक्के भरला

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

Parenting Tips: बाळांना साखर आणि मीठ का देऊ नये? डॉक्टरांचा योग्य सल्ला, कोणत्या वयात द्यावे पदार्थ

Parenting Tips: बाळांना साखर आणि मीठ का देऊ नये? डॉक्टरांचा योग्य सल्ला, कोणत्या वयात द्यावे पदार्थ

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.