Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांनो, 24वा हप्ता मिळवायचा असेल तर ही 3 कामं करा; नाहीतर पैशांपासून राहाल वंचित

PM Kisan Samman Nidhi योजनेचा पुढील हप्ता मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांनी तीन महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसी, आधार-बँक लिंकिंग आणि जमिनीची माहिती अचूक असणे गरजेचे आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 30, 2026 | 08:05 PM
अकोल्यातील शेतकऱ्यांना दोन कोटींची मदत; मदतीच्या रकमेतून कर्जवसुली नको, शासनाचे बँकांना स्पष्ट आदेश

अकोल्यातील शेतकऱ्यांना दोन कोटींची मदत; मदतीच्या रकमेतून कर्जवसुली नको, शासनाचे बँकांना स्पष्ट आदेश

Follow Us
Follow Us:
  • PM Kisan चा पुढील 2,000 रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करा.
  • आधार बँक खात्याशी लिंक आणि जमिनीची नोंदणी योग्य आहे का तपासा.
  • ‘Know Your Status’वर PM Kisan पेमेंटची स्थिती तपासा.
 

PM Kisan Samman Nidhi: देशातील शेतकरीवर्गासाठी अत्यंत महत्वाची बातमी असून देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi) चा पुढील हफ्ता मिळवण्यासाठी आवश्यक कामं शेतकऱ्यांना पूर्ण करावी लागणार आहेत. त्याशिवाय या योजनेतील पुढील हफ्ता मिळवणे मुश्किल ठरू शकते.

हि योजना केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते.

आतापर्यंत 23 हप्ते वितरित झाले असून पुढील हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, पुढील हप्ता मिळण्यासाठी केवळ योजनेत नाव असणं पुरेसं नाही. काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण असणंही महत्त्वाचं आहे.

पांढऱ्या किडीचा प्रादुर्भावाने ऊसपीक धोक्यात! वाढ खुंटल्याने पाने पिवळी; उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती

PM Kisan चा हप्ता मिळण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या

  • जमिनीची माहिती अचूक असणं गरजेचं

PM Kisanच्या नोंदींमध्ये शेतकऱ्याच्या जमिनीची माहिती योग्य आणि अद्ययावत असणे आवश्यक आहे. जमिनीशी संबंधित नोंदी अपूर्ण असल्यास किंवा आवश्यक पडताळणी झालेली नसल्यास हप्त्याच्या वितरणावर परिणाम होऊ शकतो.
  • आधार बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक

PM Kisanचा निधी थेट लाभ हस्तांतरण अर्थात DBTच्या माध्यमातून दिला जातो. त्यामुळे लाभार्थ्याचं बँक खाते आधारशी जोडलेलं असणं महत्त्वाचं आहे. आधार-बँक लिंकिंग प्रलंबित असल्यास हप्ता जमा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचे आधार सीडिंग अद्याप प्रलंबित असल्याचं समोर आलं आहे.
  • ई-केवायसी पूर्ण करा

PM Kisan लाभार्थ्यांसाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य आहे. ही प्रक्रिया PM Kisanच्या अधिकृत पोर्टलवर OTPच्या माध्यमातून पूर्ण करता येते. याशिवाय बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशनची सुविधाही उपलब्ध आहे. ऑनलाइन प्रक्रिया करताना अडचण आल्यास जवळच्या CSC केंद्राची मदत घेता येते.

लाखो शेतकऱ्यांच्या हप्त्यावर परिणाम

सरकारच्या माहितीनुसार, जमिनीशी संबंधित पडताळणी, आधार-बँक सीडिंग आणि e-KYC या प्रक्रियांमध्ये त्रुटी किंवा अपूर्णता असल्यामुळे लाखो लाभार्थ्यांच्या देयकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे PM Kisanमध्ये नोंदणी केल्यानंतरही आवश्यक तपासणी आणि पडताळणी पूर्ण करणं तितकंच महत्त्वाचं आहे.

Maharashtra News: पावसाने पाठ फिरवताच शेवगावात शेतकऱ्यांवर संकट! पिकं करपली, आता जनावरं जगवायची कशी?

हप्ता अडकला आहे का? असा तपासा

PM Kisanचा हप्ता खात्यात जमा झाला आहे की नाही, हे लाभार्थी अधिकृत पोर्टलवर तपासू शकतात. ‘Know Your Status’ या पर्यायातून पेमेंटची सद्यस्थिती पाहता येते. यामध्ये पेमेंट स्टेटस, बँकेची माहिती, UTR क्रमांक आणि रक्कम जमा झाल्याची तारीख यांसारखी माहिती उपलब्ध होऊ शकते.

त्यामुळे पुढील हप्त्याच्या आधी शेतकऱ्यांनी आपली e-KYC, आधार-बँक लिंकिंग आणि जमिनीशी संबंधित नोंदी तपासून घ्याव्यात. यापैकी कोणतीही प्रक्रिया अपूर्ण असल्यास ती वेळेत पूर्ण करणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Pm kisan samman nidhi 24th installment 3 important updates farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 08:05 PM

Topics:  

  • Farmers Issue
  • Farmers News
  • PM Kisan Samman Nidhi Yojana

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.