ajit-pawar-PC_d
धुळे – शासन आपल्या दारी या धुळ्यातील (Dhule) कार्यक्रमादरम्यान झेंड्याचा प्रश्न चांगलाच गाजल्याचे बघावयास मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) झेंडा पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी लावला नसल्याची खंत देखील अजित पवार यांनी आपल्या भाषणा दरम्यान बोलून दाखवली आहे, तर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही गोष्टींना वेळ लागतो असं म्हणत अजित पवारांना उत्तर दिले. तर शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी देखील हे पंधरा दिवसांपूर्वीच नियोजन असल्याचं म्हणत अप्रत्यक्षपणे पंधरा दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्येमध्ये सहभागी होण्यापूर्वीच हे नियोजन असल्याच मत व्यक्त केल आहे.
अजित पवार यांची नाराजी
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री गिरीश महाजन हे या कार्यक्रमासाठी उपस्थित असताना या कार्यक्रमाची तयारी पालकमंत्री या नात्याने गिरीश महाजन यांनी केली असताना, कार्यक्रम स्थळाबाहेर भाजप व शिवसेनेचेच झेंडे फडकले होते, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे या ठिकाणी न लावल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली नाराजी उघडपणे आपल्या भाषणादरम्यान बोलून दाखवली. तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या कार्यक्रमाची उत्तम तयारी केली परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा न लावल्यामुळे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांचं काम चांगल असून, तुम्ही यात तरबेज आहात असं म्हणत नवनिर्वाचीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना आता तीन पक्षांचे सरकार असल्याची आठवण करून देत, या पुढील कार्यक्रमांमध्ये आमचे देखील झेंडे लावावेत असा टोला लगावला आहे.
काही गोष्टींना वेळ लागतो…
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या भाषणातून अजित पवार यांच्या झेंड्याच्या मुद्द्यावर बोलताना काही गोष्टींना वेळ लागतो असं म्हणत, अजित पवार यांना शिंदे यांनी आमची गेल्या 25 वर्षापासून ची युती असल्याची आठवण करून देत यापुढील कार्यक्रमांमध्ये तीनही पक्षांचे झेंडे लावण्यात येतील असे आश्वासन दिले. या संदर्भात शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी देखील आपलं मत व्यक्त करत हा कार्यक्रम 15 दिवसांपूर्वीच नियोजित करण्यात आलेल होत असं म्हणत, पंधरा दिवसांपूर्वी अजित पवार हे सत्तेमध्ये सहभागी नसतानाच हे नियोजन असल्याचं स्पष्टीकरण मंत्री दादा भुसे यांनी या झेंडे वादावर दिले आहे.