Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शनिवारवाड्यातील नमाज पठाणावरुन पुण्यातील राजकारण तापलं; अनेक नेते आमनेसामने

मुस्लिम महिलांनी ज्या ठिकाणी नमाज पठण केले होते, त्या जागेवर जाऊन ती जागा गोमूत्र शिंपडून आणि शेणाने सारवून शुद्ध केली. त्यानंतर शिववंदना देखील म्हणण्यात आली. त्यानंतर शनिवारवाडा परिसरात असलेली मजार काढून टाकण्यात यावी.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 24, 2025 | 12:13 PM
शनिवारवाड्यातील नमाज पठाणावरुन पुण्यातील राजकारण तापलं

शनिवारवाड्यातील नमाज पठाणावरुन पुण्यातील राजकारण तापलं

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शनिवारवाड्यातील नमाज पठाणावरुन पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आता ठाकरेंच्या शिवसेनेने नानासाहेब पेशवे यांच्या समाधीस्थळावरून भाजपवर जोरदार टीका केली. पुणे शहरातील शनिवारवाड्यामध्ये आठ दिवसांपूर्वी मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर भाजपच्या नेत्या, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी असंख्य हिंदुत्ववादी संघटनेतील कार्यकर्त्यांसह शनिवारवाड्यामध्ये प्रवेश केला.

मुस्लिम महिलांनी ज्या ठिकाणी नमाज पठण केले होते, त्या जागेवर जाऊन ती जागा गोमूत्र शिंपडून आणि शेणाने सारवून शुद्ध केली. त्यानंतर शिववंदना देखील म्हणण्यात आली. त्यानंतर शनिवारवाडा परिसरात असलेली मजार काढून टाकण्यात यावी, अशी मागणी देखील मेधा कुलकर्णी यांनी पोलीस प्रशासनाकडे केली. त्या आंदोलनानंतर अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णी यांच्या आंदोलनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवारवाडा परिसरात आंदोलन केले.

दरम्यान, या सर्व घडामोडींदरम्यान, मुळा-मुठा नदी पात्रालगत असलेल्या नानासाहेब पेशवे यांच्या समाधीस्थळाच्या परिसरातील दुरावस्था झालेल्या ठिकाणाची ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे आणि वसंत मोरे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी स्वच्छता केली. तसेच यावेळी समाधीस्थळी असलेल्या पिंडीला दुग्धाभिषेक देखील घालण्यात आला.

यावेळी वसंत मोरे म्हणाले, “जैन समाजाच्या जमीन खरेदी प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव समोर आल्यानंतर, त्या विषयावरून लक्ष हटविण्यासाठी शनिवारवाड्यामध्ये झालेल्या नमाज पठणाचे प्रकरण समोर आणण्यात आले. ज्या व्यक्तिमत्वाने शनिवारवाडा उभारला, त्या नानासाहेब पेशव्यांच्या समाधीस्थळाची जागा मेधा कुलकर्णी यांना का आठवली नाही? मेधा कुलकर्णी यांच्यासह भाजपमधील सर्व नेतेमंडळींनी समाधीस्थळी येऊन पाहणी करावी की, नानासाहेब पेशवे यांच्या समाधीस्थळ परिसराची काय अवस्था झाली आहे. या ठिकाणी गवत आणि बाटल्या आढळून आल्या आहेत. पण ते काही झाले की, ‘हिंदुत्व, हिंदुत्व’ म्हणतात हे तर भाजपचे बेगडी हिंदुत्व आहे,” असे सांगत त्यांनी भाजप नेतृत्वावर टीका केली.

तसेच ते पुढे म्हणाले, “नानासाहेब पेशवे यांच्या समाधीस्थळाची दुरावस्था मोठ्या प्रमाणावर झाली आहे. महापालिका प्रशासनाने या ठिकाणी चांगल्या सुविधा द्याव्यात, या ठिकाणी सुरक्षा रक्षक द्यावा, अशी आमची मागणी आहे. येत्या चार दिवसांमध्ये आमच्या मागणीची पूर्तता न झाल्यास अधिकाऱ्यांच्या दालनात येथील सर्व कचरा फेकून देऊन आंदोलन करू,” असा इशारा देखील त्यांनी दिला.

Web Title: Politics in pune heats up over namaz pathan in shaniwarwada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 12:13 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Medha Kulkarni
  • political news
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

राहुल गांधींना बनायचं नक्की काय, मिठाईवाला की राजकारणी? वळले लाडू अन् तळल्या जिलेबी
1

राहुल गांधींना बनायचं नक्की काय, मिठाईवाला की राजकारणी? वळले लाडू अन् तळल्या जिलेबी

Bihar Elections 2025: बिहारमध्ये महिलांना महत्त्व किती? मतांसाठी आकर्षित योजना मात्र प्रतिनिधित्वासाठी उमेदवारी नगण्य
2

Bihar Elections 2025: बिहारमध्ये महिलांना महत्त्व किती? मतांसाठी आकर्षित योजना मात्र प्रतिनिधित्वासाठी उमेदवारी नगण्य

Maharashtra Politics: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारकडून दिलासा योजनांची घोषणा
3

Maharashtra Politics: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारकडून दिलासा योजनांची घोषणा

Bihar Elections 2025: बिहार निवडणुकीमध्ये ‘OBC कार्ड’ ठरणार गेमचेंजर? PM मोदींनी स्वतःसह केला नितीश कुमार यांचा उल्लेख
4

Bihar Elections 2025: बिहार निवडणुकीमध्ये ‘OBC कार्ड’ ठरणार गेमचेंजर? PM मोदींनी स्वतःसह केला नितीश कुमार यांचा उल्लेख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.