Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रणिती शिंदेंच्या दौऱ्यामुळे पंढरपूरकर सुखावले; नागरिकांच्या कामासाठी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

नागरिकांच्या कामासाठी प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कामे करायची नसतील तर-जिल्हा सोडून निघून जावा, असा निर्वाणीचा इशारा दिला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 20, 2024 | 03:39 PM
प्रणिती शिंदेंच्या दौऱ्यामुळे पंढरपूरकर सुखावले; नागरिकांच्या कामासाठी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : मागील दहा वर्षात नागरिकांनी खासदार हे नाव ऐकले होते. परंतु खासदाराची जवळून अनुभूती घेतली नव्हती. याचाच फायदा नूतन खासदार प्रणिती शिंदे यांना झाला आहे. नागरिकांनी त्यांच्या ओळीत भरभरून मते टाकली आहेत. परिणामी खासदार प्रणिती शिंदे या लागलीच नागरिकांच्या सेवेस लागल्या आहेत.  नागरिकांच्या कामासाठी शिंदे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कामे करायची नसतील तर-जिल्हा सोडून निघून जावा, असा निर्वाणीचा इशारा दिला.

प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील खर्डी, कासेगाव आणि गादेगावचा दौरा केला. या दौन्यात त्यांनी नागरिकांमध्ये मिसळून मोठा आनंद घेतला. मागील दहा वर्षाच्या काळात, या मतदारसंघात भाजपचे खासदार निवडून आले होते. या दोन्ही खासदारांनी कधीही नागरिकांची भेट घेतली नव्हती. किंबहुना या मतदारसंघातील नागरिकांना खासदार हा दुर्मिळच होता. यामुळे नागरिकांमध्ये भाजपच्या खासदारांविषयी नाराजी होती. हीच नाराजी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना विजयी करणारी ठरली या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी मला निवडून द्या, नागरिकांची आणि शेतकऱ्यांची कामे अडू देणार नाही, अशी विनंती नागरिकांना केली होती. मागील खासदारांविषयीची नाराजी आणि प्रणिती शिंदे यांनी केलेले आवाहन यामुळे नागरिकांनी त्यांना भरभरून मते दिली होती. याचीच परतफेड म्हणून  शिंदे यांनी नॉन स्टॉप गावभेट दौरे सुरू केले आहेत.

या गावभेट दौऱ्याप्रसंगी अनेक प्रशासकीय अधिकारी त्यांच्यासोबत होते. शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नावर प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शेतकऱ्यांची आणि नागरिकांची कामे करा, अथवा जिल्हा सोडून दूर जावा, असा इशाराच यावेळी त्यांनी दिला. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांविषयीची भूमिका सौम्य होती. परंतु मी तसे करणार नाही, शेतकरी आणि नागरिकांची कामे न झाल्यास, हक्कभंगही आणू शकते, असा सज्जड दम प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिला.

Web Title: Praniti shindes visit made pandharpurkar happy officers were held on the line for the work of the citizens nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2024 | 03:38 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • maharashtra
  • praniti shinde

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण
2

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
3

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
4

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.