
मुंबईतील दादर भवन येथे हा पक्षप्रवेश होणार असून, याबाबत जवळपास अंतिम निर्णय निश्चित झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. प्रशांत जगताप यांच्यासमोर भाजप, काँग्रेस, शिवसेना तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट असे अनेक पर्याय खुले होते. विविध पक्षांकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, अखेर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक होण्याआधीच शरद पवारांना धक्का मानला जात आहे. अजित पवार यांच्याशी युतीच्या मुद्द्यावरून नाराज झालेल्या प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने पुण्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची युतीमुळे प्रशांत जगताप नाराज असल्याची चर्चा सुरू होती. युती झाल्यास आपण राजीनामा देऊ असा इशाराही त्यांनी दिला होता. अखेर त्यांनी काल शरद पवार यांच्या पक्षातील पदाचा राजीनामा दिला आहे.
Maharashtra Politics: शरद पवारांना मोठा धक्का; पुण्यातील ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे. आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे मनापासून आभार ! २७ वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो.
आज २७ वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल ! आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या, यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार !