केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (फोटो- सोशल मीडिया)
पुणे हे क्रीडा संस्कृती असलेले वैभव संपन्न शहर
पार पडला खासदार क्रीडा महोत्सवा समारोप समारंभ
पंतप्रधान मोदींचा खेळाडूंशी व्हर्च्युअली संवाद
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील खासदार क्रीडा महोत्सव ही केवळ एक स्पर्धा नसून तरुणाईला क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून आरोग्य, शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वाची संधी देणारी चळवळ आहे. पुणे हे क्रीडा संस्कृती असलेले वैभव संपन्न असून केंद्र-राज्य सरकार तसेच ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून पुण्याच्या क्रीडा विश्वाला नवा आयाम देणार असल्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार आणि हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील खेळाडूंशी व्हर्च्युअली संवाद साधला. या संवादात मोहोळ यांच्यासह खेळाडू व्हर्च्युअली सहभागी झाले होते. यावेळी मोहोळ यांच्या पुण्यात उपस्थित विजेत्या खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी पुणे खासदार महोत्सवाचे मुख्य समन्वयक मनोज एरंडे, पॅरा ॲालिंम्पियन संदीप सरगर, राष्ट्रीय जलतरणपटू त्विषा दीक्षित, दिव्यांग खेळाडू प्रतीक घोलप यांच्यासह ३५० हून अधिक विजेते खेळाडू पुण्यातून ऑनलाइन सहभागी झाले होते.
मोहोळ पुढे म्हणाले, ‘गावागावातील, वाड्या-वस्त्यांतील सुप्त क्रीडा कौशल्यांना व्यासपीठ मिळवून देत ‘खेलो इंडिया’च्या विचाराला बळ देणारा हा उपक्रम आहे. क्रीडा संस्कृती रुजवून सक्षम, सुदृढ आणि आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दिशेने हा महोत्सव महत्त्वाचा टप्पा ठरत असून, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो प्रेरणादायी ठरेल असा विश्वास वाटतो. यावर्षी पुणे शहरातील ४६ हजारांहून अधिक खेळाडूंनी या महोत्सवात सहभाग घेतला. पुणे शहरातील क्रीडा संस्कृती जतन करण्यासाठी दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाईल.
खासदार क्रीडा महोत्सवाचा मा. मोदीजींच्या प्रेरक मार्गदर्शनाने समारोप… 📍 कोथरुड पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरातील विविध लोकसभा मतदारसंघात पार पडलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप मा. मोदीजींच्या प्रेरक मार्गदर्शनाने झाला. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी… pic.twitter.com/WdNfx8g4zP — Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) December 25, 2025
पंतप्रधान मोदींचा खेळाडूंशी प्रेरक संवाद!
खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी देशातील खेळाडूंना संबोधित करत त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. भारतात २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्यात खासदार क्रीडा महोत्सवासारखे व्यासपीठ महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. गेले दोन महिने देशातील १९० ठिकाणी झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप प्रसंगी मोदीजी खेळाडूंशी ऑनलाइन संवाद साधत होते. या महोत्सवात देशभरातून एक कोटी खेळाडू सहभागी झाले होते.






