प्रशांत जगताप यांचा राजीनामा (फोटो- सोशल मीडिया)
प्रशांत जगताप यांनी दिला पदाचा राजीनामा
पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट
26 वर्षांपासून शरद पवारांच्या नेतृत्वात केले काम
पुणे: पुण्याच्या राजकारणात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक होण्याआधीच शरद पवारांना धक्का बसला आहे. प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुण्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची युती झाल्याने प्रशांत जगताप नाराज असल्याची चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी आज शरद पवार यांच्या पक्षातील पदाचा राजीनामा दिला आहे. ते शहराध्यक्ष या पदावर कार्यरत होते. दोन्ही पक्षांच्या युतीमुळे नाराज झालेल्या प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे.
काय म्हणाले प्रशांत जगताप?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे. आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे मनापासून आभार ! २७ वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे. आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे मनापासून आभार ! २७ वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ… — Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) December 24, 2025
आज २७ वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल ! आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या, यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार !
पुणे महापालिकेसाठी शरद पवार-अजित पवार एकत्र येणार
राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधुंची युती झाल्याचे पाहायला मिळत आहे. उद्या दुपारी १२ वाजता ठाकरे बंधुंच्या युतीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या युतीचीही घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Pune Breaking News: ठरलं तर…! पुणे महापालिकेसाठी शरद पवार-अजित पवार एकत्र येणार, तारीखही निश्चित
पुणे महापालिकेवरील सत्ता अबाधित राखण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार महापालिका निवडणुकीत युती करणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे मुंबईसाठी ठाकरे बंधू तर पुण्यासाठी पवार एकत्र आल्याचे दिसत आहेत. ठाकरे बंधुंच्या युतीनंतर आता दोन्ही राष्ट्रवादीची २६ डिसेंबरला युतीची घोषणा होणार असल्याची माहिती स्वत: अजित पवारांनी दिली.






