Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ‘ रॅपीडो, उबेर ‘ सारख्या ॲप आधारित कंपन्यावर गुन्हे दाखल, प्रताप सरनाईक यांचा निर्णय

नुकतीच एका प्रवाशाचा अशा अवैध बाईक टॅक्सी वरुन जाताना मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असताना उपरोक्त ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्या शासनाच्या नियमावलीची पायमल्ली करून बेकायदेशीर व्यवसाय करीत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 03, 2025 | 05:39 PM
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपीडो, उबेर ' सारख्या ॲप आधारित कंपन्यावर गुन्हे दाखल

बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपीडो, उबेर ' सारख्या ॲप आधारित कंपन्यावर गुन्हे दाखल

Follow Us
Close
Follow Us:
  • बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करुन प्रवाशांचा जीव धोक्यात
  • रॅपीडो, उबेर यासारख्या ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्या विरोधात गुन्हे दाखल
  • शासनाने ई-बाईक धोरण नुकतेच जाहीर केले
मुंबई : शासकीय नियमावलीला फाटा देऊन बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करुन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ‘ रॅपीडो, उबेर यासारख्या ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्या विरोधात गुन्हे दाखल करा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले आहेत. शासनाने ई-बाईक धोरण नुकतेच जाहीर केले आहे. त्यानुसार अनेक ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांनी व्यवसाय सुरू केला आहे. लोकांना नियमावली व प्रवासी सुरक्षिततेसंबंधी कोणतेही प्रशिक्षण न देता त्यांची नियुक्ती करून त्या खाजगी अथवा साध्या बाईक द्वारे प्रवासी सेवा दिली जात आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. नुकतीच एका प्रवाशाचा अशा अवैध बाईक टॅक्सी वरुन जाताना मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असताना उपरोक्त ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्या शासनाच्या नियमावलीची पायमल्ली करून बेकायदेशीर व्यवसाय करीत आहेत. अशा अनेक तक्रारी मंत्री सरनाईक यांच्या कडे येत होत्या.

Ahilyanagar News: बळीराजाच्या सोनेरी स्वप्नांवर पाणी! ‘या’ पिकामुळे शेतकरी हवालदिल

या तक्रारीची दखल घेत अशा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.” देशातील इतर राज्यांत ज्या पद्धतीने या कंपन्या शासकीय नियमांना हरताळ फासून बेकायदेशीर व्यवसाय करतात, तसे महाराष्ट्रात चालणार नाही! प्रवाशांची सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवून सर्वसामान्य चालकांचे शोषण न करता नियम व सुरक्षिततेचे निकष पाळून आपला व्यवसाय वृद्धिंगत करणाऱ्या ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांना शासनाचा पाठिंबा राहील परंतु अज्ञानी चालकांचा गैरफायदा घेऊन बेकायदेशीर रित्या शासकीय नियमांची पायमल्ली करून प्रवाशांचा जीव धोक्यात आणणाऱ्या ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांवर यापुढेही अशीच धडक मोहीम राबवली जाईल “. जितक्या बाईक अशाप्रकारे बेकायदेशीर वाहतूक करताना आढळतील तितके गुन्हे संबंधित चालकावर न दाखल करता ती बाईक ज्या ॲप आधारित कंपनीची आहे, त्या मालकावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा सज्जड दम परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

त्यांच्या निर्देशानुसार २ डिसेंबर रोजी ‘ रॅपीडो ‘ (Ropn Transport Private Limited) या ॲप आधारित कंपनीविरोधात मोटार परिवहन विभागाने मुंबईतील घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ‘ रॅपीडो ‘ कंपनीच्या वतीने मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ६६ (१) आणि १९२ अन्वये बेकायदेशीररित्या ‘बाईक टॅक्सी’ चालवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आरटीओ (RTO) च्या मोटार वाहन निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत ‘रॅपुडो ‘ म्हणजे रोपन ट्रान्सपोर्ट कंपनी ‘राइड शेअरिंग’ (Ride Sharing) च्या नावाखाली प्रवाशांची वाहतूक करत असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, कंपनीने प्रवासासाठी वापरलेली वाहने ही खासगी मालकीची (Non-Transport Vehicles) होती. मोटार वाहन कायद्यानुसार, खासगी वाहने प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही, कंपनीने नफा मिळवण्याच्या उद्देशाने या नियमांचे उल्लंघन केले.

नेमका गुन्हा काय?

‘ रॅपीडो ‘ (रोपन ट्रान्सपोर्ट कंपनीने) या ॲप आधारित कंपनीने मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ६६ (१) चे उल्लंघन करून खासगी वाहनांचा (उदा. दुचाकी – बाईक) व्यावसायिकरित्या प्रवासी वाहतुकीसाठी उपयोग केला.
या संदर्भात मोटार वाहन निरीक्षक  रवींद्रनाथ श्रीरंगराव देशमुख यांनी तक्रार दाखल केली, ज्यानंतर कंपनीविरोधात कलम ६६, १९२ आणि ११२ (वाहन वेगाचे नियमन) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

तपासणी दरम्यान घाटकोपर रेल्वे स्टेशन आणि आजूबाजूच्या परिसरात तपासणी करत असताना, मोटार वाहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या ॲपद्वारे बुकिंग केलेल्या अनेक दुचाकी टॅक्सी चालकांना रंगेहाथ पकडले.

यामध्ये विनोद पाटील (चालक) आणि अप्पाराव पिडपारे (प्रवासी) यांसारख्या व्यक्तींकडून बाईक टॅक्सी सेवेचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. काही चालकांकडे दुचाकीच्या वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याचेही आढळून आले.

11 वर्षात मुंबईकरांच्या वाहन संख्येत भलीमोठी वाढ! एकूण वाहनांची संख्या 53 लाखांच्या घरात

Web Title: Pratap sarnaik on file cases against app based companies like rapido uber that operate illegal bike taxis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 05:39 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Mumbai Crime: मालाड रेल्वे स्टेशनवर थरार! लोकलमधून उतरताना धक्का लागल्याच्या रागातून चाकूहल्ला; प्रवाशाची हत्या, आरोपी फरार
1

Mumbai Crime: मालाड रेल्वे स्टेशनवर थरार! लोकलमधून उतरताना धक्का लागल्याच्या रागातून चाकूहल्ला; प्रवाशाची हत्या, आरोपी फरार

Mumbai Crime: काळजाचा ठोका चुकवणारी घटना; आईने 15 वर्षीय मुलीची खलबत्याने ने निर्घृण हत्या
2

Mumbai Crime: काळजाचा ठोका चुकवणारी घटना; आईने 15 वर्षीय मुलीची खलबत्याने ने निर्घृण हत्या

Mumbai Local Mega Block: लोकल फेऱ्या रद्द…! मुंबईकरांचे होणार हाल, रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, पाहा कधी आणि कुठे?
3

Mumbai Local Mega Block: लोकल फेऱ्या रद्द…! मुंबईकरांचे होणार हाल, रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, पाहा कधी आणि कुठे?

Silver Rate: बापरे! चांदीच्या किमतीत मोठी वाढ , ५५० तासांत १००,००० रुपयांनी वाढ
4

Silver Rate: बापरे! चांदीच्या किमतीत मोठी वाढ , ५५० तासांत १००,००० रुपयांनी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.