Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC : पत्रकारांच्या एसटी प्रवास सवलतीत सुधारणा होणार, प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती

ही नवीन सवलती देखील लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 17, 2025 | 05:51 PM
अरुंद रस्त्यामुळे एसटी बसचे चाक रूतले

अरुंद रस्त्यामुळे एसटी बसचे चाक रूतले

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती देखील लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. विधान भवनात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आधीस्वीकृतीधारक पत्रकारांच्या एसटी बस प्रवासाच्या सवलतींच्या मुद्यावर गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दीपक भातुसे, खजिनदार विनोद यादव, कार्यकारिणीचे सदस्य प्रशांत बारसिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.

“हनी ट्रॅपमध्ये महाराष्ट्रातले मंत्री, अधिकारी”; नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ, थेट पेन ड्राइव्ह दाखवला

सद्यस्थितीत अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना साध्या, निमआराम व शिवशाही (आसनी/शयनयान) बसप्रकारामध्ये १००% प्रवास भाड्याची सवलत मिळते. मात्र, या सवलतीवर ८,००० किमीची मर्यादा आहे. ही मर्यादा रद्द करण्याची मागणी वारंवार होत असून, ती मंजूर करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच पत्रकारांना एसटीच्या सर्व बसेस मधून मोफत प्रवास करण्याची सवलत अनुज्ञेय करावी अशी मागणी मुख्यमंत्री महोदय यांच्या कडे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीसोबत झालेल्या बैठकीत करण्यात आली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिले असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या मागणीबाबत सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांना एसटी प्रवासासाठी सद्या ऑनलाइन आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध नाही. येत्या १५ ऑगस्टपासून ऑनलाइन सीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना पुढील महिन्यापासून घरबसल्या एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी सीट आरक्षित करता येईल. या निर्णयांमुळे पत्रकारांना काम करताना अधिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगत मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांचे आभार मानले.

गणेशोत्सवादरम्यान आणखी ५,००० बसेस धावणार

२७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी गणेशोत्सव म्हणूनही ओळखले जाते, निमित्त, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) कोकणातील प्रवास सुलभ करण्यासाठी २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५,००० अतिरिक्त बसेस चालवणार आहे. परिवहन मंत्री आणि एमएसआरटीसीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर ही घोषणा केली. दरवर्षी, नफा किंवा तोटा याची पर्वा न करता, एमएसआरटीसी गणेशोत्सवासाठी त्यांच्या गावी बस सेवा सुनिश्चित करते. यावर्षी देखील कोकण मार्गांवर सुमारे ५,००० अतिरिक्त बसेस धावतील.

Thane News : ठाणे सिव्हिल रुग्णालयातून 50 रुग्णांना मोफत उपचार; गरजू रुग्णांना जनआरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सेवा

Web Title: Pratap sarnaik on improvements will be made in the travel concessions for journalists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 05:51 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

एसटीला इलेक्ट्रिक बसेस वेळेवर न पुरवणाऱ्या कंपनीवर राज्य सरकार मेहेरबान, श्रीरंग बरगे यांचा आरोप!
1

एसटीला इलेक्ट्रिक बसेस वेळेवर न पुरवणाऱ्या कंपनीवर राज्य सरकार मेहेरबान, श्रीरंग बरगे यांचा आरोप!

THANE : महायुतीचे यश विरोधकांनी मान्य करा, प्रताप सरनाईक यांचा टोला
2

THANE : महायुतीचे यश विरोधकांनी मान्य करा, प्रताप सरनाईक यांचा टोला

Pratap Sarnaik : एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री आराखडा’ तयार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती…
3

Pratap Sarnaik : एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री आराखडा’ तयार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती…

MSRTC News: एसटीने नऊ महिन्यांमध्ये दिली 4.50 कोटींची नुकसान भरपाई; आर्थिक तोट्यात असलेल्या…
4

MSRTC News: एसटीने नऊ महिन्यांमध्ये दिली 4.50 कोटींची नुकसान भरपाई; आर्थिक तोट्यात असलेल्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.