ठाणे स्नेहा काकडे,जाधव : सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार योग्य प्रकारे मिळत नाहीत अशी सार्वत्रिक तक्रार असली तरी ठाणे सिव्हिल रुग्णालय मात्र याला अपवाद ठरत आहे. गरजू रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजना व धर्मादाय रुग्णालय योजना अंतर्गत मोफत आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळवून देण्यात ठाणे सिव्हिल हॉस्पिटल मानवता धर्म पाळला आहे.
सिव्हिल रुग्णालयात दररोज साधारण ६०० ते ७०० रुग्ण उपचारासाठी येत असून, काहींवर लहान-मोठ्या शस्त्रक्रिया व उपचार नियमितपणे पार पाडले जातात. रुग्णालयात काही सुविधा उपलब्ध नसल्यास अशा गरजू रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्याची कार्यपद्धती ठाणे सिव्हिल रुग्णालयात यशस्वीपणे राबवली जात आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली २०२४ ते २०२५ या कालावधीत जिल्हा रुग्णालय, ठाणे येथून सुमारे ५० गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यात आले आहेत. रुग्णालयात उपचार शक्य नसलेल्या जटिल प्रकरणांमध्ये संबंधित रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) तसेच धर्मादाय रुग्णालय योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करून त्यांच्यावर चांगले उपचार करण्यात आले आहेत.
यामध्ये कर्करोगाचे ५ रुग्ण, २ गुडघा प्रत्यारोपण हृदयविकार व संबंधित उपचा ३ रुग्ण आदी इतर गंभीर आजारी रुग्णांवर डी. वाय. पाटील रुग्णालय (नेरूळ), कल्याण कॅन्सर सेंटर, बेथनी हॉस्पिटल, भक्तिवेदांत हॉस्पिटल, कौशल्य मेडिकल फाउंडेशन आदी इतर रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात आले.”गरजू, गोरगरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय आरोग्य योजना आणि सिव्हिल रुग्णालयाची सेवा-केंद्रित कार्यशैली ही अशा रुग्णांसाठी एक मोठा दिलासा ठरत आहे.असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितलं आहे.